बेन स्टोक्सनं नवीन जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला आहे.
इंग्लंडचा (England) नवा कसोटी कर्णधार (England Test Captain) जवळपास निश्चित झालाय. बेन स्टोक्सनं (Ben Stokes) नवीन जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिलाय. अलीकडंच जो रूटनं कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (England Cricket Board) नवे संचालक रॉब की यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर स्टोक्सनं यासाठी होकार दिलाय. इंग्लिश बोर्ड लवकरच नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करू शकते.
दरम्यान, स्टोक्सनेही आपले प्राधान्यक्रम सांगितले आहेत. त्याला 2 वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना पुन्हा संघात आणायचं आहे. या दोघांना क्वचितच अॅशेस मालिकेत (Ashes Series) खेळण्याची संधी मिळाल्याची माहिती आहे. यानंतर दोघांनाही वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आलं. अॅशेस मालिकेतही संघाचा मोठा पराभव झाला होता.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, बेन स्टोक्स इंग्लंडच्या नव्या कर्णधाराची जबाबदारी स्वीकारणार आहे. याशिवाय, कसोटीचे नवे प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि सायमन कॅटिच आघाडीवर आहेत. कर्स्टन यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. ईसीबीनं कसोटी आणि मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र अर्ज केले आहेत. मात्र, स्टोक्सला कसोटीत कर्णधारपदाचा अनुभव नाहीय. बहुतेक वेळा तो रूटच्या नेतृत्वाखाली उपकर्णधार म्हणून खेळलाय. दरम्यान, गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत बेन स्टोक्सला इंग्लंडचा कर्णधार बनवण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.