Ben Stokes Ashes 2023 5th Test ESAKAL
क्रीडा

Ben Stokes Ashes 2023 VIDEO : इंग्लंडने विजयाची संधी गमावली; स्टोक्सची एका हाताची मस्ती नडणार?

अनिरुद्ध संकपाळ

Ben Stokes Ashes 2023 5th Test : लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या पाचव्या अ‍ॅशेस कसोटीतील पाचव्या दिवशी इंग्लंडने सामन्यावर विजयी पकड मिळवण्याची एक नामी संधी गमावली. ऑस्ट्रेलियाचा सर्वात झुंजार फलंदाज स्टीव्ह स्मिथला मोईन अलीने 40 धावांवर जवळपास बाद केले होते. मात्र कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठी चूक केली अन् इंग्लंडने सामन्यावर विजयी पकड मिळवण्याची संधी गमावली.

ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव बिनबाद 135 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 384 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात करत सामन्यात पुनरागमन केले. ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांनी पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उडवली. (Ben Stokes Dropped Steve Smith Catch Controversy)

ख्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नरला 60 धावावर बाद केले. त्यानंतर त्याने 72 धावा करून वॉर्नर सोबत 140 धावांची सलामी देणाऱ्या उस्मान ख्वाजाची शिकार केली. दोन्ही सलामीवीर पाचव्या दिवशी अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी परतले. यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेनने 33 चेंडूत 13 धावा करत स्टीव्ह स्मिथसोबत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्क वूडने त्याला क्राऊलीकरवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला 169 धावांवर तिसरा धक्का दिला.

पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात फक्त 34 धावात ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज माघारी गेले होते. मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पहिल्या सत्राच्या सुरूवातीला आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्या इंग्लंडला सत्र संपेपर्यंत त्यावरील नियंत्रण गमावेवे लागले.

मात्र लंचपूर्वी ऑस्ट्रेलियाला एक नामी संधी चालून आली होती. सर्व काही व्यवस्थित झालं होतं मात्र बेन स्टोक्सने अगदी शेवटच्या क्षणी घोटाळा केला. 39 धावांवर खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथला मोईन अलीने चांगलाच चकावा दिला होता. मोईनचा शार्प ऑफ स्पिन झालेला चेंडू स्मिथच्या ग्लोव्हजला लागून लेग स्पिपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सच्या दिशेने उंच उडाला.

बेन स्टोक्सने हवेत उडी मारत आधी दोन्ही हातींनी हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी त्याने चेंडू एका हातातच पकडला. मात्र चेंडू पकडल्याचा आनंद व्यक्त करण्याच्या नादात त्याच्या हातू तो झेल सुटला अन् स्मिथला जीवनदान मिळाले. हे जीवनदान इंग्लंडला महागात पडू शकते.

जर स्मिथने मोठी खेळी केली तर ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ जाईल किंवा सामना अनिर्णित राखण्यात कांगारूंना यश येईल. लंचसाठी सामना थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 3 बाद 238 धावा केल्या होत्या. ट्रॅविस हेड 31 तर स्टीव्ह स्मिथ 40 धावा करून नाबाद होते. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता 146 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स घ्यायच्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT