ben stokes World Cup 2019 final controversy 
क्रीडा

३ वर्षाची पुनरावृत्ती, Ben Stokes पुन्हा केले हातवर

लॉर्ड्स कसोटीच्या तिसर्‍या दिवशी एक घटना ज्याने सर्वांना 2019 च्या विश्वचषक फायनलची आठवण करून दिली.

Kiran Mahanavar

Ben Stokes World Cup 2019 Final Controversy : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्या जात आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा बेन स्टोक्सच्या खांद्यावर आली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या तिसर्‍या दिवशी एक घटना ज्याने सर्वांना 2019 च्या विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. यावेळी विश्वचषकासारखे मोठे जेतेपद नव्हते, पण इंग्लंडचा बेन स्टोक्स मैदानात होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कसोटीच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ४३व्या षटकात ही घटना पाहायला मिळाली. रुट इंग्लंडसाठी स्ट्रायकर एंडला उपस्थित होता, तर बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. ट्रेंट बोल्टने ओव्हरचा पहिला चेंडू जो रूटने शॉट खेळला. यावर स्टोक्स एक धाव घेण्यासाठी धावला, दरम्यान किवी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो थेट नॉन स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. बेन स्टोक्स परत नॉन स्ट्राईककडे धावला, आणि चेंडू थेट बेन स्टोक्सच्या बॅटला लागला. चेंडू बॅटीला लागताच स्टोक्सने हात वर करून ही आपली चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू आलं.

2019 एकदिवसीय विश्वचषक दरम्यान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अशीच एक घटना घडली. बेन स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून थेट सीमापार गेला होता. इंग्लंडला पूर्ण 6 धावा मिळाल्या होत्या. यामुळे इंग्लंडने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तर किवी संघाचे स्वप्न भंगले. या घटनेने बराच वाद झाला होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर स्टोक्सने 54 धावा केल्या आहेत. त्याचवेळी जो रुट ७७ धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ६१ धावांची गरज आहे, तर न्यूझीलंडला ५ विकेट्स घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT