Indian players arrested for doping : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण ॲथलेटिक्स संघातील धावपटू एस. धनलक्ष्मी आणि कर्नाटकची असलेली तिहेरी उडीतील राष्ट्रीय विक्रमवीर ऐश्वर्या बाबू या दोघी डोपिंगमध्ये अडकल्या आहेत. आता या दोघीही राष्ट्रकुलसाठी बर्मिंगमला जाणार नाहीत, असे ॲथलेटिक्स महासंघातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या महिन्यात कझाकस्तान येथे कोसानोव स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धेत २४ वर्षीय धनलक्ष्मीने २२.८९ सेकंद अशी जबरदस्त वेळ दिली होती. भारतीय ॲथलिट्सने दिलेली ही सार्वकालीन तिसरी वेगवान वेळ ठरली होती. गेल्यावर्षी हिमा दास व द्युतीचंद वर मात केल्याने धनलक्ष्मी प्रकाशझोतात आली होती. धनलक्ष्मीची राष्ट्रकुलसाठी १०० मीटर व हिमा, द्युती, सरबानी नंदासोबत ४-१०० मीटर रिलेसाठी निवड झाली होती. तिची सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेसाठी २०० मीटरसाठी निवड झाली होती.
मात्र, व्हिसा न मिळाल्याने ती जाऊ शकली नाही, असे कारण देण्यात आले. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिटने ती चाचणी घेतली होती. मात्र, तिने कोणते ड्रग्स घेतले हे जाहीर करण्यात आले नाही. तसेच अद्याप तिच्यावर तात्पुरती बंदी घातल्याचेही जाहीर करण्यात आलेले नाही. चेन्नईतील आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत मायोखा जॉनीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढीत १४.११ मीटरचा नवीन विक्रम करणाऱ्या ऐश्वर्याची चाचणी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने घेतली होती. ती सुद्धा डोपिंगमध्ये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.