kho kho Sakal
क्रीडा

Kho-Kho : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल; अश्‍विनी, रेश्‍मा, वृषभ, लक्ष्मण चमकले, आता बंगालशी लढत

महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) खो-खो संघांचा झंझावात रविवारीही कायम राहिला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीवर, तर महिला संघाने पंजाबवर विजय मिळवत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) खो-खो संघांचा झंझावात रविवारीही कायम राहिला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीवर, तर महिला संघाने पंजाबवर विजय मिळवत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसमोर पश्‍चिम बंगालचे आव्हान असणार आहे. नवी दिल्ली येथे देशातील प्रतिष्ठेची खो-खो स्पर्धा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या महिलांनी पंजाबचा (२४-१०) एक डाव १४ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रातर्फे अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), रेश्मा राठोड (३.१० मि. संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (२.३० मि. संरक्षण व ८ गुण), काजल भोर (३.१० मि. संरक्षण व २ गुण), कोमल धारवटकर (३.२० मि. संरक्षण) यांनी धडाकेबाज खेळ केला. पंजाबकडून नीता देवीने (१.४०, १.३० मि. संरक्षण) एकाकी लढत दिली. तिला उर्वरित खेळाडूंकडून योग्य साथ मिळाली नाही.

पुरूष विभागात महाराष्ट्राने यजमान दिल्लीचा २८-२६ असा २ गुण व जवळजवळ साडेचार मिनिटांपेक्षा जास्त वेळ राखून पराभव केला. महाराष्ट्राच्या विजयात वृषभ वाघ (१.४०, १.२० मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (१.४०, १.३० मि. संरक्षण व ६ गुण),

प्रतीक मोरे (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), राहुल मंडल (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी शानदार खेळ करत मोलाचा वाटा उचलला. दिल्लीकडून अजय कुमार (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), मेहूल (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.

कोल्हापूरची घोडदौड

महाराष्ट्राच्या संघांप्रमाणे कोल्हापूरच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुषांच्या विभागात रेल्वेने महाराष्ट्र पोलिसांचा, केरळने विदर्भाचा, ओडिसाने तेलंगणाचा, कर्नाटकने पुद्दुचेरीचा, कोल्हापूरने तमिळनाडूचा, आंध्र प्रदेशने उत्तर प्रदेशचा,

पश्‍चिम बंगालने छत्तीसगडचा पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली. महिलांच्या विभागात पश्‍चिम बंगालने तमिळनाडूवर व गुजरातने हरियाणावर मात केली. ओडिसाने उत्तरप्रदेशला आणि नवी दिल्लीने राजस्थानला नमवले. कर्नाटकने विदर्भाचे आव्हान संपुष्टात आणले. कोल्हापूरने केरळवर व भारतीय विमान प्राधिकरणाने आंध्र प्रदेशवर विजय साकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT