Parveen Hooda Suspended esakal
क्रीडा

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा पॅरिस ऑलिम्पिक कोटा गमावणार?

अनिरुद्ध संकपाळ

Parveen Hooda Suspended : भारताच्या महिला बॉक्सरला पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी परवीन हुड्डाने आपला पॅरिस ऑलिम्पिक कोटा हा जवळपास गमावला आहे. वाडाने परवीन हुड्डाला 12 महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.

परवीनने 57 किलो वजनी गटात एशियन गेम्स 2023 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. मात्र परवीनला ती एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत कुठं होती हे वाडाला सांगण्यात अपयश आलं आहे. नियमानुसार जागतिक उत्येजक द्रव्य विरोधी समितीने (वाडा) दीड वर्षासाठी निलंबित केलं आहे. तिचं निलंबन हे या महिन्यापासून सुरू होत आहे. ही निलंबनाची कारवाई नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. याबाबतची माहिती परवीनचे कोच सुधीर हुड्डा यांनी पीटीआयला दिली आहे.

परवीनकडं काय आहे पर्याय?

परवीनच्या बाबतीत आता काय पर्याय आहे याबाबत तिचे वकील विदुश्पत सिंघानिया यांनी सांगितले की ते आंतरराष्ट्रीय चाचाणी समितीच्या संपर्कात आहेत. परवीवरील बंदी कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, 'आम्ही वाडा आणि ITA सारख्या काही समितींच्या संपर्कात आहोत. आम्ही शिक्षा कमी करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करत आहोत.

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही त्यांनी परवीनबाबत दिलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहोत. जर असं झालं तर तिच्यावर कोणतीही बंदी असणार नाही. आम्ही यााबबत तातडीनं पावलं उचलत आहोत. कारण त्याचा परिणाम ऑलिम्पिक कोट्यावर होण्याची शक्यता आहे.'

जरी परवीनचे वकील जोरदार प्रयत्न करत असले तरी तिचा ऑलिम्पिक कोटा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. परवीन जर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकली नाही तर भारताची एक पदकाची आशा असलेली खेळाडू कमी होणार आहे.

सध्या भारताच्या चार महिला बॉक्सर ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्या आहेत. यात निखत झरीन (50 किलो), प्रिती (54 किलो), परवीन (57 किलो) आणि लोव्हलिना बॉरगोहीन (75 किलो) या खेळाडूंचा समावेश आहे. सध्या तरी एकाही पुरूष बॉक्सरला ऑलिम्पिक कोटा मिळवता आलेला नाही. त्यांच्यासाठी 25 मे रोजी होणारी बँककॉदमधील स्पर्धा ही शेवटची संधी असेल.

(Olympics Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT