boxing Amit Panghal  sakal
क्रीडा

CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये अमितही जिंकला; खात्यात आणखी एक सुवर्णपदक

बॉक्सिंगमध्ये अमित पंघलने पुरुषांच्या ४८-५१ किलो वजनी गटातही पटकावले सुवर्णपदक

Kiran Mahanavar

Amit Panghal won gold medal : भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. अमित पंघलने पुरुषांच्या ४८-५१ किलो वजनी गटातही सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करत बॉक्सिंगमध्ये आज देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या पंघलने अखेर यावेळी 51 किलो वजनाचे सुवर्ण जिंकले. भारतानं आतापर्यंत 15 सुवर्णपदकासह एकूण 42 पदक जिंकली आहेत. अंतिम फेरीत त्याने इंग्लिश बॉक्सर मॅकडोनाल्डची चांगलीच धुलाई केली.

अमित पांघलने 2017 मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याच वर्षी अमितने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा करिष्मा केला. अमित पांघलने 2018 मध्ये इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने इतिहास रचला.

आशियाई अजिंक्यपद 2019 च्या स्पर्धेचे सुवर्ण, 2017 मध्ये कांस्य व 2021 मध्ये रौप्यपदक त्याने जिंकले आहे. जागतिक स्पर्धेत 2019 ला त्याने रौप्यपदक जिंकले आहे. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मायना गावातला त्याचा जन्म झाला, त्याचे वडील विजेंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि भाऊ अजय हा भारतीय सैन्यात कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT