Boycott 83 Sakal
क्रीडा

Boycott 83 : नवरा-बायकोमुळं कपिल पाजींच्या सुवर्ण क्षणाला 'ग्रहण'

Boycott 83 मागे दीपिका की आणखी काही....

सुशांत जाधव

कपिल पाजी (Kapil Dev) अन् टीम इंडियाने (Team India) क्रिकेटच्या पंढरीत रचलेल्या इतिहासाची गाथा सांगणारा '83' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबाबत क्रिकेट चाहत्यांसह बॉलिवूड चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका (Deepika Padukone) देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसली आहे. एका बाजूला चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला ट्विटरवर ‘बॉयकॉट 83’ (Boycott 83) असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी जोर धरत आहे. चित्रपट बघण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांना यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या मुद्याच कारण ठोसपणे सांगणं तस कठीणच आहे. कारण एकदा एखादा ट्रेंड निर्माण झाला की त्या ट्रेंडत्या माध्यमातून अनेक मुद्दे जोडून तो विषय आणखी तापवण्याचा प्रकार सोशल मीडियावरुन केला जात असतो. आता या चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे तर दीपिका पदुकोण हा चित्रपटाची डोकेदुखी वाढवणारा पहिला मुद्दा आहे. यामागचं कारण दीपिका दीपिका पदुकोण हीची वैयक्तिक भूमिका आहे. दीपिकाच्या 'छपाक' या चित्रपटापासून तिला अशा प्रकारच्या ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे.

‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकानं राजधानीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तिची ही भेट तिच्या काही लोकांना चांगलीच खटकली. त्याचे पडसाद आजही तिच्या चित्रपटाच्या बाबतीत उमटताना दिसते. ती छटा आता '83' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाहायला मिळते.

Boycott 83 हॅश टॅगच्या माध्यमातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे चाहतेही बॉलिवूडसंदर्भात नाराजी व्यक्त करत आहेत. सुशांतचे चाहते रणवीरच्या एका कृत्याची आठवण करुन देऊन चित्रपटावर बहिष्काराची भाषा करत आहेत. एका बॉलिवूड पुरस्कारावेळी रणवीर सिंहने सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवली होती. त्यामुळे आम्ही त्याचा चित्रपट पाहणार नाही, असा सूर उमटल्याचे सोशल मीडिवार पाहायला मिळते. नवरा-बायकोवरील रागामुळे नेटकऱ्यांनी कपिल पांजीच्या सुवर्ण काळाचा इतिहासाला कुठेतरी ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. एखाद्या कलाकाराला वैयक्तिकरित्या टार्गेट करण्यासाठी तो साकारत असलेल्या भूमिकेविरोधात घेतलेली टोकाची भूमिका ही अयोग्यच आहे. कारण त्यामुळे ज्या व्यक्तीचा प्रवास या कथेतून मांडला जातोय त्यावर अन्याय होतो, हे चाहत्यांनी लक्षात घ्यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT