क्रीडा

बायकोला सोडून केलं 'भाची'सोबत लग्न, चौथ्यांदा बाप बनतोय फुटबॉलपटू

सकाळ डिजिटल टीम

सर्व टीकेला धुडकावून देत मार्च 2020 मध्ये आपल्या भाचीशी लग्न केले. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत.

जयेश सावंत - 'प्रेम आंधळं असतं' असं नेहमी म्हटले जाते, मात्र प्रेम आणि नातं यांच्यातील फरक नाही कळावा हे पचवणं खरंतर फारच कठीण! अशीच काहीशी अजब प्रेमाची गजब गोष्ट ब्राझीलच्या फुटबॉलपटूसोबत घडली आहे. ब्राझीलचा फुटबॉल स्टार हल्कची (Hulk) भाची त्यांच्या चौथ्या बाळाची आई होणार आहे.

खरं तर, 32 वर्षीय कॅमिला अँजेलो (camila angelo) ही हल्कच्या माजी पत्नी इराण अँजेलोची (Iran Souza) भाची आहे आणि त्या अर्थाने ती देखील त्याची भाची झाली. असे असूनही दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. स्वत: फुटबॉल स्टारने आपल्या भाचीच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर दिली आहे. ब्राझीलचा ३५ वर्षीय स्ट्रायकर हल्क 2019 पासून त्याची माजी पत्नी इराण अँजेलोच्या (Iran Souza) भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, मात्र गेल्या वर्षी त्याने भाचीसोबत राहण्यासाठी आपल्या पत्नीसोबतचे 12 वर्षांचे नाते संपवले.

या 'विचित्र' प्रेमासाठी हल्कवर बरीच टीकाही झाली, पण त्याचा त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. हल्कने सर्व टीकेला धुडकावून देत मार्च 2020 मध्ये आपल्या भाचीशी लग्न केले. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. या फुटबॉलपटूने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की त्याची भाची त्याच्या चौथ्या मुलाची आई होणार आहे. हल्कने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघे अल्ट्रासाऊंड स्कॅन दाखवून आनंद व्यक्त करत आहेत.

हल्कने (Hulk) डिसेंबर 2019 मध्ये भाचीसोबतचे त्याचे नाते उघड केले. त्याने त्याच्या आई-वडिलांना आणि कॅमिला अँजेलोच्या भावाला फोन करून याची माहिती दिली होती. हल्कने तेव्हा स्पष्ट सांगितले की, त्याला काहीही लपवायचे नाही, त्यामुळे तो आपल्या नात्याबद्दल सर्वांना सांगत आहे. हल्कची पत्नी इराण अँजेलोला तिच्या पतीचे भाचीसोबतच्या असलेल्या अफेअरचा खुलासा झाल्याने धक्काच बसला होता. हल्कने त्यावेळी आपल्याला आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख दिले आहे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. मात्र, फुटबॉलपटूने यासाठी पत्नीलाही दोषी ठरवले. तो म्हणाला की इराण त्याच्याशी वाईट वागायची आणि यामुळेच त्याने हा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

SCROLL FOR NEXT