Brazilian swimmer Ana Carolina Vieira with her boyfriend Instagram
क्रीडा

Paris Olympic 2024: 'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये बॉयफ्रेंडबरोबर फिरणं स्विमरला पडलं महागात; ऑलिम्पिक व्हिलेजमधूनच काढलं बाहेर

Brazilian swimmer kicked out of Paris Olympic village: पॅरिस ऑलिम्पिक सुरू असताना रात्री बॉयफ्रेंडबरोबर फिरायला गेल्यानं एका स्विमरला ऑलिम्पिक व्हिलेजमधूनच बाहेर करण्यात आलं आहे.

Pranali Kodre

Paris Olympic 2024 News: पॅरिसला सिटी ऑफ लव्ह असंही म्हटलं जातं. त्यामुळे या शहरात आपल्या पार्टनरबरोबर फिरण्याची अनेकांनी इच्छा असतेच. मात्र ब्राझिलच्या महिला स्विमरला हे महागात पडलं आहे. तिला आता पॅरिस ऑलिम्पिकमधूनच बाहेर व्हावं लागलंय.

ब्राझीलची २२ वर्षीय स्विमर ऍना कॅरोलविना विएरा तिचा बॉयफ्रेंड आणि स्विमर गॅब्रिएल सँटोस याच्यासह २६ जुलै रोजी पॅरिसमध्ये रात्री फिरायला गेली होती. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकचे नियम मोडल्याच्या कारणाने आता त्यांना त्यांच्या क्रीडा प्रकारातून बाहेर व्हावं लागलं आहे.

इतकंच नाही, तर विएराला ऑलिम्पिक व्हिलेजमधूनच बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर होणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. विएरा आणि सँटोस या दोघांची जोडी 4X100m फ्रिस्टाईल रिले प्रकारात सामील होणार होती.

दरम्यान, नियम तोडल्याबद्दल सँटोसने माफी मागितली असल्याने त्याला व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब्राझिलियन ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विएराला ज्यावेळी या बाबत प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळी तिने अपशब्द वापरले.

ब्राझिलच्या स्विमिंग टीमचे प्रमुख गुस्तावो ओत्सुका यांनी सांगितले की विएराने ब्राझिलियन स्विमिंग टीमने घेतलेल्या निर्णयाचा आक्रमकतेने आणि अपमानजनक विरोध केला. त्यामुळे गॅब्रिएल सँटोस याच्यावर चेतावणी देत कारवाई करण्यात आली, तर ऍना कॅरोलिया विएराला टीममधून काढन टाकत शिक्षा देण्यात आली. ती तातडीने ब्राझीलला परत जाईल.'

दरम्यान, ओत्सुका यांनी असंही म्हटलंय की इथे आम्ही सुट्टीसाठी आलेलो नाही.

विएराने यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्याआधी सँटोसबरोबर आयफेल टॉवरसमोरील फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT