Brendan Taylor claimed an Indian businessman offered cocaine and Black Mail for Spot Fixing esakal
क्रीडा

'भारतीय व्यापाऱ्याने कोकेन देऊन स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केले'

भारतीय व्यापाऱ्याने कोकेन देऊन मला स्पॉट फिक्सिंगसाठी केले ब्लॅकमेल : झिम्बावेच्या माजी कर्णधाराचा दावा

अनिरुद्ध संकपाळ

झिम्बावेचा माजी कर्णधार ब्रँडन टेलरने (Brendan Taylor) ट्विट करून एक खळबळजनक दावा केला आहे. ब्रँडन टेलरने २०१९ मध्ये भारतात एका हॉटेलमध्ये एका भारतीय व्यापाऱ्याने (Indian Businessmen )त्याला कोकेन दिले. त्यानंतर कोकेन (Cocaine) घेतानाचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ आधारे त्याने मला स्पॉट फिक्सिंगसाठी (Spot Fixing) ब्लॅकमेल केले. असा दावा ट्विट करून केला आहे. ब्रँडन आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो की त्याने चार महिन्यांनी आयसीसीला याबाबतची माहिती दिली होती. (Brendan Taylor claimed an Indian businessman offered cocaine and Black Mail for Spot Fixing)

झिम्बावेचा माजी कर्णधार (Zimbabwe Former Captain) ब्रँडन टेलरने त्याला स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा दावा केला. भारतीय व्यापाऱ्याने असे केल्याचे तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. याचबरोबर तो या पोस्टमध्ये लिहितो की, या प्रकारानंतर तो ज्यावेळी झिम्बावेला परतला त्यावेळी त्याच्या शरिरावर वेदनादायी रॅश उटली होती. याचबरोबर तणावामुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला होता. मी उद्ध्वस्त झालो होते. मला स्ट्राँग अँटी सायकॉटिक औषधे देण्यात आली होती असेही तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो.

याचबरोबर ब्रँडन टेलर आपल्या ट्विटरवर पोस्ट (Twitter Post) केलेल्या पत्रात म्हणतो की, त्याने कोणत्याही प्रकारचे स्पॉट फिक्सिंग केलेले नाही. मी आयसीसीच्या चौकशीत संपूर्ण सहयोग दिला आणि पारदर्शताही ठेवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

SCROLL FOR NEXT