Brendon McCullum Say Bazball Theory Hilarious don't Like It esakal
क्रीडा

Bazball : मॅक्युलम स्वतःच्या 'थेअरी'ला म्हणाला हास्यास्पद; स्मिथला दिले प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : जेव्हापासून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅडमन मॅक्युलमने (Brendon McCullum) इंग्लंडच्या कसोटी संघाचे (England Test Cricket Team) प्रशिक्षकपद स्विकारले आहे. इंग्लंडच्या विजयाचा सूर्य काही मावळलेला नाही. मॅक्युलम आल्यापासून इंग्लंडचा संघ एका वेगळ्याच माईंटसेटने खेळत आहे. याच पद्धतीच्या क्रिकेटला 'बॅझबॉल' (Bazball) असे नाव देण्यात आले आहे. मात्र हे नाव कोणी आणि कधी दिले हे काही समजू शकलेले नाही. दरम्यान, खुद्द ब्रँडन मॅक्युलमलाही ही बॅझबॉलची चर्चा हास्यास्पद वाटते.

मॅक्युलमचे टोपण नाव बॅझ आहे. त्या प्रेरणेतूनच बॅझबॉल ही संकल्पना अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडने मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून न्यूझीलंडला 3 - 0 असा व्हाईट वॉश आणि भारताला पाचव्या कसोटीत पराभवाचा धक्का दिला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) इंग्लंडच्या या आक्रमक कसोटी क्रिकेटला रंजक असे संबोधले. मात्र ही थेअरी पुढच्या वर्षी होणाऱ्या अॅशेस सिरीजपर्यंत कायम राहील असे वाट नाही असेही तो म्हणाला. दरम्यान, मॅक्युलम डब्ल्यूए ब्रेकफास्ट शोमध्ये अॅडम गिलख्रिस्टशी बोलताना म्हणाला, 'मी बॅझबॉलवरून अनेक वक्तव्य ऐकली आहेत. आगामी अॅशेस मालिका चांगलीच आव्हानात्मक असणार आहे. आणि या मालिकेत आम्ही ज्या प्रकारे क्रिकेट खेळत आहोत त्याला आव्हान मिळेल. आम्ही या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहोत.'

मॅक्युलम पुढे म्हणाला, 'तुम्ही तुमच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करणे हाच खेळाचा अर्थ असतो. सर्वोत्तम संघाविरूद्ध सर्वोत्तम खेळणे. न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघ तगडे होते. ऑस्ट्रेलियाचे आव्हान वेगळी गोष्ट आहे कारण अॅशेस मालिका ही वेगळ्या स्तरावरची मालिका आहे.'

'मला आशा आहे की इंग्लंडचा संघ हा माईंटसेट कायम ठेवतील. लोक जे आम्हाला बॅझबॉल हे विशेषण वापरत आहे ते हास्यास्पद आहे. ते मला आवडत नाही. खेळाडूंनी चांगल्या कामगिरीसाठी खूप कष्ट घेतले आहेत. यासाठी खूप खोलात जावून विचार देखील करण्यात आला आहे. त्यांनी दबावाचा खूप चांगल्या प्रकारे सामना केला.' पुढच्या वर्षीची अॅशेस मालिका ही इंग्लंडमध्ये होणार आहे. यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT