Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan Singh ESAKAL
क्रीडा

WFI Election Brijbhushan Singh : ज्याच्या डोक्यावर बृजभूषण यांचा हात तोच होणार अध्यक्ष; जाणून घ्या मतांच गणित

अनिरुद्ध संकपाळ

Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 6 जुलै रोजी होणार आहे. याची अधिसुचना निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी काढली. लैंगिक शोषणाचे आरोप झालेले बृजभूषण शरण सिंह हे गेले तीन टर्म अध्यक्ष आहेत. मात्र यावेळी त्यांना या निवडणुकीत भाग घेता येणार नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितल्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती निवडणूक लढवणार नाहीये.

क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची बैठक झाली होती. त्या बैठकीत कुस्तीपटूंनी बृजभूषण किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणताही सदस्य निवडणूक लढवत असेल तर गोष्टी सुधारणार नाहीत असा इशारा दिला होता. यामुळे बृजभूषण यांना निवडणुकीत उभे राहू नये असे सांगण्यात आले आहे. बृजभूषण यांचा मुलगा करण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. तर त्यांचे मेहुणे आदित्य प्रताप सिंह हे जॉईंट सेक्रेटरी आहेत. बृजभूषण यांचे जावई विशाल सिंह एक्जिक्युटिव्ह मेंबर आहेत.

38 फेडरशेन मतदान करतात

कुस्तीपटूंनी बृजभूषण यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र या प्रयत्नाला फारसं यश येताना दिसत नाहीये. जरी बृजभूषण आणि त्याचे कुटुंबीय निवडणूक लढवत नसले तरी भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष हा बृजभूषण सिंह यांचा वरदहस्त असलेलाच असणार आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडताना सल्लग्नित राज्य कुस्ती फेडरशेनचे पदाधिकारी मतदान करत असतात. प्रत्येक राज्याच्या अध्यक्ष आणि सचिवाला प्रत्येकी एक मत मिळते. दिल्लीतून दोन तर इतर केंद्रशासित प्रदेशातील कुस्ती फेडरेशनच्या एका प्रतिनिधीला मत देण्याचा अधिकार आहे. या मतांच्या आधारावरच अध्यक्ष निवडला जातो.

बृजभूषण यांच्या ताब्यात 75 टक्के मतं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बृजभूषण यांना 36 मधील जवळपास 75 टक्के फेडरेशनचे समर्थन आहे. यात हरियाणा कुस्ती परिषदेचा देखील समावेश आहे. याच राज्यातील सर्वात जास्त कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे अनेक राज्य कुस्ती फेडरेशन ही गेल्या 12 वर्षात बृजभूषण हे अध्यक्ष असताना तयार झाली आहेत. त्यामुळे ज्या कोणत्या उमेदवाराला बृजभूषण यांचा पाठिंबा असेल त्यात उमेदवाराला या संघटना मतदान करणार. त्यामुळे त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT