Wrestler Protest Brijbhushan Singh Arrest  esakal
क्रीडा

Wrestler Protest : बृजभूषण यांना 15 जूनपर्यंत अटक नाहीच; दिल्ली पोलीस घेणार 5 देशांची मदत?

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Brijbhushan Singh Arrest : भारताच्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषण केल्या आरोप करत दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. दिल्ली पोलिसांना या प्रकरणी 15 जून पर्यंत चार्चशीट दाखल करायची आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा जोरदार तपास सुरू केला असून आता त्यांनी पाच देशांच्या कुस्ती महासंघाकडून मदत मागितली आहे. मात्र याचा वेळेत फायदा होईल अशी चिन्हे दिसत नाहीयेत.

दिल्ली पोलिसांनी मागितली 5 देशांकडून मदत

ज्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत कजाकिस्तान, बल्गेरिया, इंडोनेशिया, मंगोलिया आणि किग्रिस्तान येथे आयोजित केलेल्या स्पर्धांचा उल्लेख केला आहे. पुरावे गोळा करण्याच्या उद्येशाने दिल्ली पोलिसांनी या पाच देशांच्या कुस्ती महासंघांकडे लिखित स्वरूपात मदत मागितली आहे. या घटनेसंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओंची मागणी केली आहे.

मात्र या प्रकरणात पेच निर्णाम झाला आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार या 5 देशांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनांपैकी कोणीही 15 जूनपूर्वी माहिती देऊ शकत नाही. दिल्ली पोलिसांकडे आपला तपास अहवाल सादर करण्यासाठी फक्त 15 जून पर्यंतचाच वेळ आहे. 15 जूननंतर या देशांकडून मिळालेली माहिती सप्लिमेंट्री आरोप पत्रात सामील केली जाऊ शकते.

भारतीय कुस्ती महासंघाची 4 जुलैला निवडणूक

भारतीय ऑलिम्पिक संघाने भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक ही 4 जुलैला घेण्याची योजना तयार केली आहे. यासाठी जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सात जूनला आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंशी चर्चा केली होती. त्यावेळी WFI ची निवडणूक 30 जूनला घेण्यात यावी अशी मागणी झाली होती. मात्र इतक्या लवकर निवडणूक घेणे शक्य होणार नव्हते कारण WFI च्या विशेष बैठकीसाठी 21 दिवसांची नोटीस देणे गरजेचे होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT