David Beckham_Mukesh Ambani 
क्रीडा

David Beckham: प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमला 'अँटिलिया'वर मेजवाणी; अंबानी कुटुंबांनं 'असा' केला पाहुणचार

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपच्या भारत-न्यूझीलंडमधील सेमी फायनलला त्यानं हजेरी लावली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : जगप्रसिद्ध ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. पहिल्यांदाच तो भारतात आला असून बुधवारी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपच्या भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या सेमी फायनलला त्यानं हजेरी लावली होती. स्टेडियममध्ये बेकहॅमला पाहुनं अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं.

यावेळी सेलिब्रेटिंसह अंबानी कुटुंबानं त्याची भेट घेतली होती. पण आज त्याला रिलायन्स इंडस्ट्रिजची चेअरमन मुकेश अंबानी थेट अँटिलियावर येण्याचं निमंत्रण दिलं. (British Soccer Star David Beckham invited at Antilia by Mukesh Ambani, Nita Ambani and family)

बेकहॅमची अँटिलियावर हजेरी

अँटिलिया हे अंबानी कुटुंबाचं मुंबईतलं निवासस्थान आहे. या ठिकाणचा अंबानी कुटुंबासोबतचा डेव्हिड बेकहॅमचा फोटो समोर आला आहे. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह त्यांची मुलं आणि डेव्हिड बेकहम दिसतो आहे. अंबानी कुटुंबानं त्याचं जंगी स्वागत केलं तसेच त्याच्यासाठी मेजवाणीचा बेत होता. (Marathi Tajya Batmya)

भारतात येण्याचा परफेक्ट टाईम

दरम्यान, डेव्हिड बेकहॅमनं आपल्या भारत दौऱ्याबाबत बोलताना सांगितलं की, मला भारतात येऊन मनापासून आनंद होत आहे. मी परफेक्ट वेळेला भारतात आलो आहे. कारण भारतातील दिवाळीचा सण तसेच क्रिकेट वर्ल्डकपचा सिझन सुरु आहे. (Latest Marathi News)

बेकहॅम वर्ल्डकपमध्ये हेजेरीचं प्रयोजन काय?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसी युनिसेफसोबत महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचं काम सुरु केलं आहे. विशेषतः क्रिकेटच्या माध्यमातून जेंडर इक्वॅलिटीसाठी काम केलं जाणार आहे. त्यातच डेव्हिड बेकहॅम हा युनिसेफचा गुडविल अॅम्बॅसिडर आहे. त्यामुळेच भारतात होत असलेल्या क्रिकेटवर्ल्डकपला त्यानं हजेरी लावली आहे.

भारतात आल्यानंतर त्यानं गुजरातला भेट दिली. गुजराती लोक खूपच छान आहेत, असंही त्यानं म्हटलं आहे. गुजरात विद्यापीठाला भेट दिल्यानंतर तिथल्या तरुण संशोधकांना भेटून आपल्याला आनंद वाटल्याचंही त्यांनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT