BWF World Championships Lakshya Sen and Kidambi Srikanth Sakal
क्रीडा

आपल्याच माणसाविरुद्ध श्रीकांत जिंकला अन् बॅडमिंटनमध्ये इतिहास घडला!

सुशांत जाधव

BWF World Championships Srikanth vs Lakshya historic semifinal : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऐतिहासिक सेमी फायनलमध्ये भारताचा अनुभवी शटलर किदाम्बी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि युवा लक्ष्य सेन (Lakshya Sen) यांच्यातील लढत रंगतदार झाली. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक करत पुढचे दोन्ही सेट जिंकून श्रीकांतने फायनल गाठली आहे. श्रीकांतने सेमीफायनलमध्ये 17-21, 21-14, 21-17 अशा फरकाने आपल्यातच देशाच्या युवा लक्ष्य सेनला पराभूत केले. पराभवामुळे लक्ष्य सेनला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. दुसरीकडे श्रीकांत आता सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे. फायनलमध्ये पोहचताच त्याच्या नावे ऐतिहासिक कामगिरीची नोंद झालीये. यापूर्वी एकाही भारतीय पुरुष खेळाडूने या स्पर्धेची फायनल गाठलेली नाही. BWF World Championships स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करणारा तो पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरलाय. याआधी महिला गटातून पीव्ही सिंधूनं सुवर्ण कामगिरी करुन दाखवली आहे.

दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतची कमबॅकवाली खेळी

दुसऱ्या सेटमध्येही लक्ष्य सेन याने जबरदस्त सुरुवात करत श्रीकातला बॅकफूटवर ढकलेले होते. 5-3 अशी आघाडी त्याने घेतली. त्यानंतर श्रीकांतने आपला अनुभव पणाला लावत दिमाखात कमबॅक केले. त्याने स्कोअर 8-4 असा केला. दुप्पट पाँइंट्सची आघाडी मिळवताना श्रीकांतने सलग चार पाँइंट्सही घेतले. लक्ष्यनं 12-13, 14-16 या स्कोअर लाइनपर्यंत संघर्ष केला. पण इथून पुढे श्रीकांतने त्याला अधिक संधी न देता दुसरा सेट 21-14 असा नावे करत सामना बरोबरीत आणला.

असा रंगला पहिला सेट

अनुभवाच्या जोरावर सुरुवातीला श्रीकांतने अल्प आघाडी घेतली होती. पहिल्या सेटमध्ये श्रीकांत पहिल्या सहा पाँईटपर्यंत आघाडीवर दिसला. मात्र त्यानंतर लक्ष्यनं दमदार कमबॅक करत अनुभवाला मागे टाकले. 8-7, 11-8, 13-10, 16-10 अशी आघाडी भक्कम करत लक्ष्यनं श्रीकांतसमोर आव्हान निर्माण केले. अनुभवी श्रीकांतने यातून पुन्हा सेट 16-16 असा बरोबरीत आणला. पिछाडी भरून काढत श्रीकांतने पुन्हा 17-16 अशी आघाडी घेतली. पण लक्ष्यनं पुन्हा सामना आपल्या बाजूनं वळवला. त्याने पहिला सेट 21- 17 असा खिशात घातला.

किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन पहिल्यांदा जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सेमी फायनलपर्यंत पोहचले होते. दोघांनी देशासाठी पदक निश्चित करत नवा इतिहास रचला. 12 व्या मानांकित श्रीकांतने नँदरलंडच्या मार्क कालजोऊ याला 26 मिनिटांत 21-8, 21-7 असे पराभूत करत सेमी फायनल गाठली होती. दुसरीकडे बिगर मानांकित लक्ष्य सेन याने चीनच्या जुन पेंग झाओ याच्या विरुद्धच्या संघर्षमय लढतीत 21-15, 15-21, 22-20 असा विजय मिळवला होता.

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला खेळाडूंचा बोलबाला

लक्ष्य आणि श्रीकांत यांच्या आधी प्रकाश पादुकोण (1983 मध्ये कांस्य पदक) तर बी साई प्रणीतने (2019 मध्ये कांस्य पदक) कमावले आहे. महिला गटात सुवर्ण कामगिरीचा पराक्रम हा पीव्ह सिंधूच्या नावे आहे. सिंधूने सर्वाधिक पाच पदके जिंकली असून सायना नेहवालने दोन पदक जिंकली आहेत. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या दोघींनी महिला दुहेरीत 2011 मध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

पहिल्यांदाच समोरासमोर लढत

जागतिक बॅडमिंटनच्या कोर्टवर सेमी फायनलमध्ये प्रवेश करत नवा इतिहास रचणाऱ्या श्रीकांत आणि लक्ष्य या दोघांनी आतापर्यंत एकमेकांसोबत एकही लढत खेळली नव्हती. एकमेकांच्या समोरासमोर येण्याची या दोघांची ही पहिलीच वेळ ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT