kadambi srikanth sakal
क्रीडा

भल्या भल्यांना जमलं नाही ते श्रीकांतनं करून दाखवलं

Kiran Mahanavar

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत (kadambi srikanth) सध्या चर्चेत आहे. श्रीकांतने बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021(BWF World Championships) च्या अंतिम फेरीत धडक मारली परंतु अंतिम फेरीत सिंगापुरच्या लोह कीन येवने श्रीकांतचा पराभव केला.

असे असले तरी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. पराभूत होऊनही रौप्य पदकासह त्याने इतिहास रचला आहे.
याआधी भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश आले.
7 फेब्रुवारी 1993 रोजी आंध्र प्रदेशातील रावुलपलेममध्ये जन्मलेल्या श्रीकांतने आपल्या मोठ्या भावाकडून प्रेरित होऊन बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
श्रीकांतची पहिली मोठी कामगिरी 2011 मध्ये जेव्हा त्याने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यानंतर श्रीकांतने ऑल इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण जिंकले.
श्रीकांतने 2014 चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियरच्या अंतिम फेरीत दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅन विरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळवून एक नवीन कामगिरी केली.
2017 मध्ये सलग 3 सुपर सीरिज फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT