Captain Rohit Sharma Instagram post before first ODI series as a full time captain  esakal
क्रीडा

'कॅप्टन' रोहितची पहिल्या मालिकेपूर्वीची पोस्ट व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या पहिल्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी पायाचा स्नायू दुखावल्यामुळे तो संपूर्ण दौऱ्यालाच मुकला होता. याच दौऱ्यावर वनडे मालिकेवेळी तो आपल्या पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हातात घेणार होता. मात्र आता तो वेस्ट इंडीज (India vs West Indies) बरोबरच्या वनडे मालिकेत तो भारताचे नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान, वेस्ट इंडीज बरोबरची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. (Captain Rohit Sharma Instagram post before first ODI series as a full time captain)

रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपला पाठमोरा फोटो शेअर केला. आणि त्याला 'आता सुरूवात करण्यासाठी आतूर आहे.' असे कॅप्शन दिले. रोहित शर्माची पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिली वनडे मालिका असणार आहे. विराट कोहलीने टी २० वर्ल्डकप पूर्वी आपले टी २० मधील कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवत रोहितला कर्णधार केले होते.

त्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका हरल्यानंतर कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. बीसीसीआयने कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र चर्चेत रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT