Carrom sakal
क्रीडा

Sports Award : छत्रपती क्रीडा पुरस्कारातून कॅरम, शरीरसौष्ठव वगळले

महाराष्ट्र सरकारकडून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस्, घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना शिवछत्रपती व अन्य पुरस्कारपात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र सरकारकडून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस्, घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना शिवछत्रपती व अन्य पुरस्कारपात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे. २९ डिसेंबरला जाहीर करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीनुसार या खेळांना बगल देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानंतर चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, स्नूकर व बिलियर्डस् या खेळांमधून महाराष्ट्रातील खेळाडू आपली धमक दाखवत असतात. त्यामुळे कारकीर्द, नोकरी, उदरनिर्वाह याबाबतचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. खेळ व खेळाडूंना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा सूर याप्रसंगी उमटू लागला आहे.

ऑलिंपिक, आशियाई, राष्ट्रकुल यांसारख्या स्पर्धांमध्ये समावेश नसणे किंवा तालुका/ जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन न करणे असे मुद्दे समोर आणून महाराष्ट्र सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. याआधी मात्र या खेळांमधील खेळाडूंना शिवछत्रपती व अन्य क्रीडा पुरस्कार दिले जात होते, पण यंदा निकष लावून विशिष्ट खेळांना डावलण्यात आले आहे.

ज्या खेळांना वगळण्यात आले आहे, अशा खेळांच्या समावेशासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारकडून आता कोणते पाऊल उचलण्यात येते याची उत्सुकता आहे.

केंद्राकडून नोकऱ्या,पण राज्याकडून दुर्लक्ष

महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपले परखड मत व्यक्त करताना म्हटले, की केंद्र सरकारकडून त्यांच्या अखत्यारीत असलेल्या नोकऱ्या कॅरमपटूंना देत असतात, पण महाराष्ट्र सरकारकडून ५ टक्के आरक्षित नोकऱ्याही दिल्या जात नाहीत. आता तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून त्यांना दूर ठेवण्यात आले आहे.

सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला अनुदान

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. कार्याध्यक्षपदी निवडून आलेले संजय मोरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता ते म्हणाले, सरकारकडून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला ६ ते १५ लाखांचे जिम साहित्य पुरवले जाते. अशा जिममधून गुणवान खेळाडू तयार होतात अन्‌ याच खेळातील खेळाडूंना आता राज्यातील महत्त्वाच्या पुरस्कारापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, हे हास्यास्पद आहे. आम्ही आता या खेळाच्या समावेशासाठी सरकारकडे विनंती करणार आहोत, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना म्हटले.

शिवछत्रपती व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली

पायाभूत सुविधांचा अभाव. तालुका/ जिल्हास्तरीय स्पर्धा न होणे. प्रचार व प्रसारापासून दूर. अशा प्रकारात मोडणाऱ्या घोडेस्वारी, गोल्फ व यॉटिंग या खेळांना पुरस्कारासाठी पात्र क्रीडा यादीतून वगळण्यात आले आहे. ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल या महत्त्वाच्या तीन स्पर्धांमध्ये समावेश नसल्यामुळे पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम आणि स्नूकर, बिलियर्डस्‌ या खेळांना पुरस्कारासाठी पात्र क्रीडा यादीतून बाहेर काढण्यात आले आहे.

क्रीडा विभागाशी संपर्क नाही

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याशी या प्रकरणाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच क्रीडा विभागातील इतर कुणाचाही संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT