D. Gukesh Chess sakal
क्रीडा

D. Gukesh Chess : डी. गुकेशचे झोकात पुनरागमन ; सुपरबेट जलद व ब्लिटझ्‌ बुद्धिबळ स्पर्धा ,प्रज्ञानंद व केमरवर दमदार विजय

सकाळ वृत्तसेवा

वॉरसॉ (पोलंड) : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आव्हानवीर असलेल्या डी. गुकेश याने सुपरबेट जलद व ब्लिटझ् बुद्धिबळ स्पर्धेमध्ये झोकात पुनरागमन केले. पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर गुकेशने शुक्रवारी भारताच्याच आर. प्रज्ञानंद व जर्मनीच्या विन्सेट केमर यांच्यावर दमदार विजय संपादन केले. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखण्यातही त्याला यश मिळाले.

डी. गुकेशला पहिल्या दिवशी दोन लढतींत पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर एका लढतीत ड्रॉवर समाधान मानावे लागले होते; पण शुक्रवारी त्याने चौथ्या फेरीच्या लढतीत आर. प्रज्ञानंद याला ४१ चालींमध्ये पराभूत करताना उल्लेखनीय कामगिरी केली. गुकेश याने पुढील फेरीत केमर याच्यावर विजय साकारला. या लढतीत गुकेश याने तांत्रिकदृष्ट्या सरस खेळ केला. आता गुकेशने सहा गुणांची कमाई केली आहे.

भारताच्या डी. गुकेश याच्यासह आर. प्रज्ञानंद व अर्जुन एरीगेसी यांनीही समाधानकारक कामगिरी केली. प्रज्ञानंद याने सात गुणांची कमाई केली असून अर्जुन याने सहा गुणांची कमाई केली आहे. प्रज्ञानंद चौथ्या स्थानावर असून अर्जुन सातव्या स्थानावर आहे. पहिल्या दिवशी छान खेळ करणाऱ्या किरील शेवचेंको याची घसरण झाली आहे.

कार्लसन, वेई यी अव्वल

दिग्गज बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन व वेई यी या दोन खेळाडूंनी प्रत्येकी आठ गुणांसह पहिले व दुसरे स्थान पटकावले आहे. शुक्रवारचा दिवस वेई यी याने गाजवला. त्याने दिवसात झालेल्या तीनही लढतींमध्ये विजय साकारला कार्लसनची बरोबरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT