Chess Yerawada Jail esakal
क्रीडा

Chess For Freedom : फिडे अन् इंडियन ऑईलच्या मान्यवरांची येरवडा कारागृहाच्या सुवर्णपदक विजेत्या संघाला भेट

Chess For Freedom Yerawada Jail : दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला पुण्यात प्रारंभ

अनिरुद्ध संकपाळ

Chess Yerawada Jail : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे) यांच्या वतीने आयोजित आणि इंडियन ऑईल पुरस्कृत दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला पुण्यात उत्साहात प्रारंभ झाला. या परिषदेचे औचित्य साधून फीडे व इंडियन ऑईलच्या पदाधिकाऱ्यानी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी फिडे आयोजित तिसऱ्या आंतर खंडीय बंदीवानांच्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या येरवडा कारागृहाच्या संघातील खेळाडूंची भेट घेतली. या संघातील खेळाडूंना इंडियन ऑईल पुरस्कृत "परिवर्तन प्रिझन टू प्राईड" या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

या पदाधिकारऱ्यामध्ये इंडियन ऑईलच्या मनुष्य बळ विभागाच्या संचालिका रश्मी गोवील, फिडेच्या सामाजिक परिषदेचे सल्लागार मिखाइल कोरेनमन, फिडेच्या सामाजिक परिषदेचे आयुक्त आंद्रे वोगटिन, केंद्रीय कारागृह व सुधारगृह सेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (आयपीएस), एआयसीएफचे सचिव देव पटेल, एमसीएचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयुर, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, तसेच, कारागृह विभाग व इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे विविध देशांमधील कारागृह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना अमिताभ गुप्ता म्हणाले की, कारागृहातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित असून त्याअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या संघाने सुवर्णपदक पटकावल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

मिखाईन कोरेनमन यावेळी म्हणाले की, येरवडा कारागृहाचे अधिकारी आणि इंडियन ऑइल यांचे चेस फॉर फ्रीडम उपक्रमाबद्दल कौतुक केले पाहिजे. सुवर्णपदक विजेत्या संघाला भेटून आम्ही या परिषदेला प्रारंभ करत आहोत. समाजातील वेगळ्या वर्गात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी इंडियन ऑइल या प्रयोजकांची प्रशंसा केली.

कारागृहातील संघाला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक केतन खैरे म्हणाले की, कैद्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याबाबत सुरुवातीला प्रचंड नकारात्मक विचार मनात येत होते. पण, माझा मित्र ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्या आग्रहामुळे मी कैद्यांना प्रशिक्षण देण्यास तयार झालो. सुरुवातीला भावनेच्या भरात गुन्हा घडलेल्या कैद्यांची निवड करून २० जणांना शिकवण्यास सुरुवात केली. नंतर असे लक्षात आले की निवडलेले सर्वच कैदी खूप समर्पित आहेत.'

'प्रशिक्षणासाठी ते दररोज एक तास आधीच येत असत. सुरुवातीला बुद्धिबळ म्हणजे काय, येथून प्रशिक्षण सुरू केले होते. त्यांना दररोज सकाळी ११ ते २ या वेळेत प्रशिक्षण देत होतो. त्यानंतर २०२१मध्ये आम्ही स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. पण २०२२मध्ये आम्ही आशियाई स्पर्धेत रौप्य आणि जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. २०२३मध्ये या संघाने राष्ट्रीय, आशियाई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुवर्णपदकासह जगज्जेतेपद पटकावले.

इंडियन ऑइलच्या मनुष्य बळ संचोलिका रश्मी गोविल म्हणाल्या की, परिवर्तन प्रिझन टू प्राईड आणि नई दिशा या उपक्रमांना प्रारंभ केला. कारण कोणालाही दुसरी संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. तसेच, पुनर्वसनासाठी एक महत्वाचे माध्यम म्हणून क्रिडा क्षेत्राचा उपयोग होऊ शकतो यावर आमचा विश्वास आहे. येरवडा कारागृह व भोपाळ सुधारगृह या संघांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे आमच्या उपक्रमाला मोठेच पाठबळ मिळाले आहे.

रश्मी गोविल यांनी कारागृहातील आजी माजी बंदिवानांनी चालविलेल्या उम्मीद- ए होप या विक्री केंद्र उपक्रमाची माहिती दिली. तसेच यावेळी फिडे व इंडियन ऑईल आणि येरवडा कारागृहाचा संघ यांच्यात मित्रत्वाचा बुद्धिबळ सामनाही खेळविण्यात आला.

(Sports News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT