नवी दिल्ली : जेव्हापासून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे तेव्हापासून जागतिक स्तरावावर रशियाला जागतिक स्तरावर वेगळे पाडण्याची मोहिम सुरू झाली आहे. क्रीडा क्षेत्रातही रशियाच्या खेळाडूंवर ठिकठिकाणी बंदी घालण्यात येत आहे. मात्र भारतात होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडमध्ये आता रशिया आणि युक्रेन यांच्यात अनोखा सामना पहायला मिळणार आहे. (Chess Olympiad FIDE President Election Russia And Ukraine Face Each Other Viswanathan Anand Also Contesting for Vice President)
चेस ऑलिम्पियाड 2022 चे यजमानपद भारत भुषवत आहे. ही स्पर्धा फुटबॉल वर्ल्डकप, ऑलिम्पिक आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. तमिळनाडूतील महाबलीपुरम शहरात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून तेथेत एकमेकांविरूद्ध युद्ध पुकारलेल्या रशिया आणि युक्रेन यांचा आमना सामना होणार आहे. या स्पर्धेत ओपन आणि महिला गटात जवळापस 187 देशांमधून विक्रम 343 संघांनी स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल केल्या आहेत.
या चेस ऑलिम्पियाड दरम्यान, 180 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ फेडरेशनच्या प्रमुखांची निवड करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ फेडरेशन सध्याचे अध्यक्षपद हे रशियाचे माजी उप पंतप्रधान आरकेडी वोरकोविच यांच्याकडे आहे. यंदाच्या निवडणुकीत तेच सध्या आघाडीवर आहेत. जर ते जिंकले तर त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असणार आहे.
त्यांच्या विरूद्ध युक्रेनचे ग्रँडमास्टर अँडी बॅरीशपोलेट्स उभे आहेत. त्यांनी मे महिन्याच्या शेवटी आपली उमेदवारी घोषित केली होती. अध्यक्षपदासाठी अजून दोन उमेदवार देखील रिंगणात आहेत. बचर कॉआटली ते सध्या एफआयडीईचे उपाध्यक्ष आहेत आणि बेल्जियमचे इनालबेक चेरिपोव हे देखील रिंगणात आहेत.
बुद्धीबळात रशियाची एकाधिकारशाही
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता जवळापस 4 महिने होत आले आहेत. यामुळे संपूर्ण जगता उलथापालथ होत आहे. जागतिक स्तरावर अनेकांनी रशियाला वेगळे पाडले आहे. मात्र बुद्धीबळ संघटनेवर वोरकोविच यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनी विजयाची खात्री आहे. दुसरीकडे त्यांचे विरोधक म्हणतात की रशिया बुद्धीबळाच्या जागतिक संघटनेवर दीर्घ काळापासून नियंत्रण ठेवून आहे. आता त्यांचा घटिका भरली आहे.
उपाध्यक्षाच्या शर्यतीत विश्वनाथन आनंद
युद्धातील दोन देशांमध्ये बुद्धीबळाच्या जागतिक संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असताना 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एक महत्वाची बाब देखील आहे. वोरकोविच यांनी आपल्या गटातर्फे उपाध्यक्ष पदासाठी विश्वनाथन आनंदचे नाव पुढे केले आहे. जर वोरकोविच अध्यक्ष झाले तर भारताचा पाच वेळा बुद्धीबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा विश्वनाथन आनंद एफआयडीईचा उपाध्यक्ष होईल. दुसरीकडे युकेनने आनंदच्या विरोधात त्यांचे माजी कोट पीटर हेन नीलसन यांचे नाव पुढे केले आहे.
नीलसन सध्या जागतिक स्तरावर क्रमांक एकवर असणाऱ्या मॅग्नस कार्लसनला देखील गुरूमंत्र देत आहे. नीलसन हे एफआयडीईचे कडवट टीकाकार आहेत. त्यांनी पैशाच्या गैरवापरावर देखील आवाज उठवला होता. नीलसन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या चार वर्षात झालेल्या प्रमुख 20 स्पर्धांपैकी रशियाने 11 स्पर्धांचे आयोजन केले आहे. इथे आम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.