chess world cup 2023 gukesh magnus carlsen praggnanandhaa arjun-erigaisi vidit gujrathi quarterfinal sakal
क्रीडा

Chess World Cup 2023 : अर्जुन अन् प्रग्नानंद आव्हानवीरांच्या शर्यतीत

विश्‍वकरंडकात उपांत्य फेरीसाठी चुरस; जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारताचा एक खेळाडू दावेदार

सकाळ वृत्तसेवा

बाकू (अझरबैझान) : भारताचे चार खेळाडू विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते; पण उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीनंतर एका स्थानासाठी दोन भारतीय लढत आहेत. विदित गुजराती व डी. गुकेश या भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले असून आर. प्रग्नानंद व अर्जुन इरिगेसी यांच्यातील लढत १-१ अशा बरोबरीत राहिल्यामुळे टायब्रेकमध्ये यांच्यातील विजेता ठरणार आहे.

टायब्रेक उद्या (ता. १७) होईल. प्रग्नानंद व अर्जुन यांच्या लढतीतील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, अझरबैझानचा निजात एबासोव व अमेरिकेचा फॅबियानो कारुआना यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

मॅग्नस कार्लसन - डी. गुकेश यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या लढतीत कार्लसन याने विजय मिळवला होता. त्यामुळे गुकेश याला बुधवारच्या लढतीत विजय मिळवणे आवश्‍यक होते. गुकेश याने कार्लसनला कडवी झुंज दिली; पण त्याला विजय मिळवता आला नाही. ही लढत ड्रॉ राहिली. कार्लसनने दीड गुणांसह आगेकूच केली.

निजात एबासोव - विदित गुजराती यांच्यामधील उपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही खेळाडूंना अर्धा गुण मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात जो खेळाडू जिंकेल, त्याला आगेकूच करता येणार होती. निजात याने विदितला हरवण्याची किमया करून दाखवली. निजातने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दरम्यान, फॅबियानो कारुआना याने दीड गुणांसह घोडदौड केली.

विजयासह पुनरागमन

आर. प्रग्नानंद - अर्जुन इरिगेसी यांच्यामधील उपांत्यपूर्व लढत रोमहर्षक ठरली. पहिल्या टप्प्यात अर्जुनने प्रग्नानंदला हरवले. प्रग्नानंदवर बुधवारच्या लढतीत दबाव होता. पण त्याने दुसऱ्या टप्प्यात विजय साकारून झोकात पुनरागमन केले व बरोबरी साधली. आता दोन खेळाडूंमध्ये टायब्रेकची लढत होईल.

मॅग्नस कार्लसन याने कँडीडेट स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे उपांत्य फेरीतील उर्वरित तीन खेळाडूंना कँडिडेट स्पर्धेत सहभागी होता येईल.

जगज्जेत्याला आव्हान

यंदाचा जगज्जेता चीनचा खेळाडू डिंग लिरेन याला पुढच्या वर्षी कोणता खेळाडू आव्हान देईल, यासाठी कँडिडेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विश्‍वकरंडकातील अव्वल तीन खेळाडू कँडिडेट स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. निजात एबासोव, फॅबियानो कारुआन या दोघांसह आर. प्रग्नानंद व अर्जुन इरिगेसी या भारतीयांपैकी एकाला कँडिडेट स्पर्धेत खेळता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT