Cheteshwar Pujara : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दाेन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियात निवड न झाल्याने चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये तांडव घातला. पुजारा रॉयल लंडन चषक स्पर्धेत इंग्लंडच्या देशांतर्गत वन-डे स्पर्धेत खेळत आहे. ससेक्सकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने पुन्हा शतक ठोकले.
समरसेटविरुद्ध त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पुजाराने 105 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 117 धावांवर नाबाद परतला. पुजाराच्या नाबाद शतकी खेळीमुळे ससेक्सने सॉमरसेटसमोर 319 धावांचे लक्ष्य गाठले. पहिले तीन सामने गमावल्यानंतर ससेक्सचा हा पहिलाच विजय आहे. पुजाराचे हे तीन सामन्यातील दुसरे शतक आहे.
टॉंटन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात सॉमरसेटने प्रथम फलंदाजी करताना कर्टिस कॅम्पर आणि अँड्र्यू उमेद यांच्या शतकांच्या जोरावर 318 धावा केल्या. प्रत्युत्तरात ससेक्ससाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पुजाराने 113 चेंडूंत 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी साकारत संघाला 49व्या षटकात विजय मिळवून दिला.
या शतकासह पुजाराने 4 सामन्यात 302 धावा केल्या आहेत. लंडन कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. पृथ्वी शॉ सध्या आघाडीवर आहे. शॉला दुहेरी शतकाचा (244 धावा) फायदा झाला आहे.
चेतेश्वर पुजाराने डर्बीशायरविरुद्धच्या मागील सामन्यात 61 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. त्याआधी या महिन्याच्या सुरुवातीला नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध नाबाद 106 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने सलग तीन सामन्यांत 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
रॉयल लंडन कपच्या या मोसमात पुजाराने 4 सामन्यात 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पृथ्वी शॉ पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 3 सामन्यात 304 धावा केल्या आहेत.
35 वर्षीय पुजाराने 3 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ससेक्ससाठी आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. 6 सामन्यांमध्ये 68.12 च्या सरासरीने 545 धावा केल्या आहेत. जूनमध्ये, ओव्हल येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 आणि 27 धावा केल्या. यानंतर, गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, याचा बदला तो वनडेत घेत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.