Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : पुजारा आता 20,000 मनसबदार! तेंडुलकर, गावसकरांच्या पंक्तीत विराजमान

टीम इंडियातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये घालतोय धुमाकूळ

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Ranji Trophy 2024 : भारताची भींत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय कसोटी संघात नाहीये. मात्र चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 चा हंगाम गाजवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याने नुकतेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण केल्या. सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आता चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर आता चेतेश्वर पुजाराचा समावेश झाला आहे. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 17 द्विशतकी खेळींचा समावेश आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000 धावा करणारे भारतीय खेळाडू

  • सुनिल गावसकर - 25,834 धावा

  • सचिन तेंडुलकर - 25,396 धावा

  • राहुल द्रविड - 23,794 धावा

  • चेतेश्वर पुजारा - 20,013 धावा

चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 च्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या 20000 धावा पूर्ण केल्या. सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने विदर्भविरूद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने 137 चेंडूत 66 धावांची खेळी केली.

पुजाराने विश्वराजसिंह जडेजासोबत 87 धावांची भागीदारी रचली. मात्र हर्ष दुबेने पुजाराला 66 धावांवर बाद केलं. बाद होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने सौराष्ट्रला चांगल्या स्थितीत पोहचवले.

पहिल्या डावात सौराष्ट्रचा फलंदाज पुजाराने तळातील फलंदाजांना हाताशी घेत दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याने 105 चेंडूत 43 धावा जोडल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला. यामुळेच सौराष्ट्रने 206 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT