Joe Root and Kane Williamson ICC Tweet
क्रीडा

न्यूझीलंड विरुद्ध खेळताना जो रुटचे टिम इंडियाला चॅलेंज

अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड (New Zealand ) आणि भारतीय संघाविरोधात (Team India) एकूण सात कसोटी सामने खेळणार आहे.

सुशांत जाधव

अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड (New Zealand ) आणि भारतीय संघाविरोधात (Team India) एकूण सात कसोटी सामने खेळणार आहे.

कसोटी क्रिकेटमधील भारत आणि न्यूझीलंड या दोन अव्वल संघाला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा दारुण पराभव करण्याचे इरादे बोलून दाखवले. दोन्ही संघाला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने खेळणे हीच अ‍ॅशेस मालिकेसाठी पूर्वतयारी असेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) म्हटले आहे. (clean-sweep-against-india-and-nz-will-be-the-best-preparation-for-ashes-says-joe-root )

अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड (New Zealand ) आणि भारतीय संघाविरोधात (Team India) एकूण सात कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात झाली. सामन्यापूर्वी रूट म्हणाला की, आस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेची चर्चा आता सुरु होईल. याकडे आपल्याला पाठ फिरवता येणार नाही. आम्ही अ‍ॅशेस मालिकेची तयारी पहिल्यापासूनच करत आहोत. इंग्लंडमधील क्रिकेट प्रेमी आणि प्रत्येक खेळाडूसाठी ही मालिका प्रतिष्ठेची आहे. या लढतीपूर्वी आमच्यासाठी पुढील सात कसोटी सामने महत्त्वाचे असतील. आम्हाला जगातील सर्वोत्तम दोन संघा विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल, असे रुटने म्हटले आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टिम इंडियाला क्लीन स्वीप करण्याचे आव्हान स्वीकारल्याचे दिसते. भारतीय संघाने मायदेशात इंग्लंडला एकहाती पराभूत केले होते. हीच कामगिरी त्यांच्या 'सरजमीवर' करण्याच्या इराद्याने विराटच्या नेतृत्वाखालील संघ प्रयत्नशील असेल.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. या लढतीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. तर वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. पाहुण्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

England (Playing XI): रॉय बन्स, डॉमिनिक सिब्ले, झॅक क्रॉउले, जो रुट (कर्णधार), डेनियल लॉरेन्स, ओली पोप, जेम्स ब्रासी (यष्टीरक्षक), ओली रॉबिनसन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँड्रसन.

New Zealand (Playing XI): टॉम लॅथम, ड्वेन कॉन्वे, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीर वॉटलिंग (यष्टिरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, कायले जेमिनसन, टीम सौदी, नील वेगनार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT