CM Eknath Shinde deputy CM Devendra Fadnavis Campaign For Sharad Pawar Ashish Shelar Panel In MCA Election  ESAKAL
क्रीडा

MCA Election : मुख्यमंत्र्यांची पवार - शेलार पॅनलसाठी बॅटिंग; म्हणाले काहींची झोप उडाली असेल

अनिरुद्ध संकपाळ

MCA Election : बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या पॅनलने हातमिळवणी केल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकीकडे एका वेगळ्या नरजेने पाहिले जात आहे. दरम्यान, आज (दि. 19) शरद पवार - आशिष शेलार यांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बैठक घेतली. यावेळी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर बसल्याचे दिसून आले. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप पाटील आणि अमोल काळे एकमेकांसमोर आहेत.

या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय बॅटिंग देखील केली. ते म्हणाले की, 'शरद पवारांनी आम्हाला सांगितले की ते करावेच लागते. शरद पवारांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. केंद्रीय मंत्रीपद देखील भुषवले आहे.' शेजारी बसलेल्या दवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिंदे म्हणाले की, 'इकडे नागपूर कनेक्शन देखील आहे. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे काही लोकांची झोप उडू शकते.'

शिंदे यांनी आपल्या भाषणात जरी राजकीय चिमटे काढले असले तरी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकारण नाही हे देखील सांगितले. ते म्हणाले की, 'जर यात राजकारण असतं तर इतके सगळे लोक एकाच व्यासपीठावर आले नसते. महाराष्ट्राला आणि मुंबईला एक वेगळी परंपरा आहे.' शिंदे यांनी हे सरकार सर्वांचे आहे ते क्रिकेटपटू आणि खेळाडूंचेही आहे असे म्हणत क्रिकेटपटू आणि संस्थाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले.

अमोल काळे हे आशिष शेलार पॅनेलचे उमेदवार आहेत. तर पूर्वी संदीप पाटील हे शरद पवार यांच्या पॅनेलचे उमदेवार होते. मात्र शरद पवार यांनी उडी मारत आशिष शेलार यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी देखील शेलार पॅनेलच्या अमोल काळेंना पाठिंबा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT