Commonwealth Championship Boxing 
क्रीडा

अमित, निखतची सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल

राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये आपापल्या गटात गाठली अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : भारतीय बॉक्सर्ससाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील शनिवारचा दिवस आनंददायी ठरला. पुरुषांच्या गटात अमित पांघल याने; तर महिलांच्या गटात नीतू घंघास व निखत झरीन यांनी अंतिम फेरी गाठली. यामुळे आता या तीन बॉक्सर्सचे किमान रौप्यपदक पक्के झाले आहे. भारतीय या बॉक्सर्सनी सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

अमितने ४८ ते ५१ किलो वजनी गट प्लायवेट प्रकाराच्या लढतीत झाम्बियाच्या पॅट्रिक चिनएम्बा याला ५-० अशा फरकाने धूळ चारली आणि अंतिम फेरीत वाटचाल केली. पहिल्या फेरीनंतर अमित २-३ अशा फरकाने पिछाडीवर होता, पण अखेरच्या क्षणांमध्ये त्याने आपला खेळ उंचावला व जजेसकडून त्याला महत्त्वाचे गुण देण्यात आले. अखेर तो विजयी झाला. आता उद्या खेळवण्यात येणाऱ्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत अमितसमोर इंग्लंडच्या कायरॅन मॅकडोनाल्डचे आव्हान असणार आहे.

नीतूच्या झंझावाती खेळासमोर कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोनचा निभाव लागला नाही. महिलांच्या ४५ ते ४८ किलो वजनी गटाच्या लढतीत नीतूच्या ठोशांसमोर प्रियांका गारद झाली. अखेर रेफ्रींनी ही लढत थांबवली. नीतू अंतिम फेरीत पोहोचली. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत तिला यजमान देश इंग्लंडच्या डेमी रेसझ्तान हिचा सामना करावयाचा आहे.

निखतने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील लाईट फ्लाय प्रकारात इंग्लंडच्या सवान्नाह सबली हिच्यावर अगदी आरामात विजय साकारला. निखतने या लढतीत ५-० अशा फरकाने बाजी मारली. आता अंतिम फेरीच्या लढतीत उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉल हिच्याशी निखतला दोन हात करावे लागणार आहेत.

जास्मिनला ब्राँझपदक

भारताची महिला बॉक्सर जास्मिन लॅमबोरिया हिला ६० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठता आली नाही. इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनकडून तिला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. रिचर्डसनने या लढतीत ३-२ अशा फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत घोडदौड केली. जास्मिनला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT