Commonwealth Games 2022 Day 3 Updates : बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज देशाला पाचवे पदक मिळाले आहे. जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू आहे. आतापर्यंत भारताला पाच पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.
राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवशी संकेत महादेव सरगरने देशाला पहिले पदक मिळवून दिले, तर मीराबाई चानूनेही सुवर्णपदक पटकावले. साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 99 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य 11.2 षटकात पूर्ण केले. मंधानाने 42 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली.
भारतीय पुरुष हॉकी संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांच्या गट ब सामन्यात घानाचा 11-0 असा पराभव केला. उपकर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक तीन गोल केले. हा भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगचा 300 वा आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंगचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
भारताच्या गटात घाना व्यतिरिक्त इंग्लंड, वेल्स आणि कॅनडाचे संघ आहेत. घानानंतर भारताचा पुढील सामना सोमवारी यजमान इंग्लंडशी होणार आहे. यानंतर भारतीय संघ 3 ऑगस्टला कॅनडा आणि 4 ऑगस्टला वेल्सशी भिडणार आहे.
भारताने घानाविरुद्ध अनेक गोल केले आहेत. तिसऱ्या तिमाहीचा खेळ संपला. तो 9-0 ने आघाडीवर आहे.
भारताने सामन्यातील पाचवा गोल केला आहे. भारताने आता घानावर 5-0 अशी आघाडी घेतली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना घानासोबत सुरु झाला आहे. अभिषेकने भारतासाठी पहिला गोल केला आहे.
जोश्ना चिनप्पाने महिला एकेरीत न्यूझीलंडच्या कॅटलिन वॉट्सचा 11-8, 9-11, 11-4, 11-6 असा पराभव करत स्कॉच येथे उपांत्यपूर्व फेरी गाठली.
तिसर्या प्रयत्नात हजारिकाला 86 किलो वजन उचलता आले नाही. दुसऱ्या प्रयत्नात 84 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले, पण तिसऱ्या प्रयत्नात 86 किलो वजन उचलण्याचा निर्णय घेतला. यातही ती अपयशी ठरली. स्नॅच फेरीत त्याचा स्कोअर 81 किलो इतका आहे.
क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पदक जिंकण्याची आशा कायम ठेवली. आता भारताचा पुढचा सामना बार्बाडोसशी आहे. पाकिस्तानने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि टीम इंडियाने ते दोन गडी गमावून पूर्ण केले. स्मृती मानधनाने 63 धावा केल्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आज सहावे पदक मिळू शकते. महिलांच्या 59 किलो गटात हजारिका पोपी देशाला पदक मिळवून देऊ शकते. त्यांचा सामना सुरू झाला आहे.
भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. साथियानने दुसरा एकेरीचा सामना जिंकला. साथियानने हा सामना 11-2, 11-3, 11-5 असा जिंकला. यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा पुढील सामना आता नायजेरियाशी होणार आहे.
पाकिस्तानच्या महिला संघाने भारतीय महिला संघासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला आहे. आता टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 108 चेंडूत 100 धावांची गरज आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत वेटलिफ्टर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. दुस-या दिवशी चार पदकांसह 19 वर्षीय मिझोरमचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने (Jeremy Lalrinnunga) तिसर्या दिवशी 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिव थापा यांना बॉक्सिंगमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर तो बाहेर पडला आहे. 63.5 किलो वजनी गटात स्कॉटलंडच्या रीस लिंचने त्याचा 1-4 असा पराभव केला.
टेबल टेनिसमध्ये भारताच्या सरथ कमालने बांगलादेशच्या मोहम्मद शब्बीरचा 11-4, 11-7, 11-2 असा पराभव केला. यासह भारताने गटात बांगलादेशवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहे.
भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने 50 किलो वजनी गटात हेलेनाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. निखतने हा सामना 5-0 ने जिंकला.
बॉक्सिंगमध्ये भारताच्या निखत जरीनची 48 ते 50 किलो वजनी गटात स्पर्धा सुरू झाली आहे. जर तिने हा सामना जिंकला तर ती उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.
स्विमिंगमध्ये भारताच्या श्रीहरी नटराजने 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने 25.52 अशी वेळ नोंदवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेमी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आमची युवा शक्तीने इतिहास घडवत आहे! जेरेमी लालरिनुंगाचे अभिनंदन केले, ज्याने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रकुल खेळांचा अभूतपूर्व विक्रमही केला. तरुण वयातच त्यांनी अपार कीर्ती मिळवली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात दोन बदल केले. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरूवात झाली. दोन्ही संघाला आपपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात जेरेमीने भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकले आहे. या खेळांमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने काल सुवर्णपदक पटकावले होते. जेरेमीने एकूण 300 किलो वजन उचलून गेम रेकॉर्डसह पदक जिंकले आहे. त्याने स्नॅचमध्ये 140 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे, मात्र या सामन्याला खराब हवामानाची दखल घेण्यात आली आहे. नाणेफेकीपूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे
जेरेमीने स्नॅचची सुरुवात 136 किलो वजनाने केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने हे वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचलले.
वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 67 किलो वजनी गटासाठी स्पर्धा सुरू झाली असून, या गटात भारताच्या जेरेमीकडे लक्ष लागले आहे. तो पदकाचा प्रबळ दावेदार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करणार आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. हरमनप्रीत कौर अँड कंपनीला त्यांच्या पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता, तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात बार्बाडोसने 15 धावांनी पराभूत केले होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
जिम्नॅस्टिक स्पर्धा लवकरच सुरू होणार असून भारताचा योगेश्वर सिंग पुरुषांच्या अष्टपैलू अंतिम फेरीत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. देशाला त्याच्याकडून खूप आशा आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेचा आज तिसरा दिवस असून आज अनेक महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ मैदानात उतरेल, तर निखत झरीन आणि शिव थापा बॉक्सिंगमध्ये नशीब आजमावतील. त्याचवेळी भारत बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. पुरुष हॉकी संघही आज आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 31 जुलै रोजी होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे भारताचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.