Commonwealth Games 2022 India 1 day schedule sakal
क्रीडा

Commonwealth Games: पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार; पहा संपूर्ण शेड्यूल

पहिल्याच दिवशी भारताचे अनेक खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.... पहा संपूर्ण शेड्यूल

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 शुक्रवार 29 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू होणार आहेत. 28 जुलैला उद्‍घाटन होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत नेहमीच प्रबळ दावेदार राहिला आहे. पहिल्याच दिवशी भारताचे अनेक खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला क्रिकेट संघाला पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. महिला क्रिकेटचा प्रथमच या खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये टी-20 सामनेही खेळवले जाणार आहेत. यापूर्वी 1998 मध्ये पुरुष क्रिकेटला त्यात स्थान मिळाले होते. मात्र त्यावेळी भारतीय संघाला एकही पदक जिंकता आले नव्हते.

पहिल्या दिवशी क्रिकेटशिवाय महिला हॉकी संघ पहिला सामना घानाचा करावा लागणार आहे. बॉक्सिंगमध्ये शिवा थापा आणि सुमित कुंडू आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. याशिवाय भारतीय खेळाडूंना जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, सायकलिंग, स्क्वॉश आणि बॅडमिंटनमध्येही भारतीय खेळाडू खेळणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने नेमबाजीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

Commonwealth Games 2022 India 1 day schedule :

लॉन बाउल : भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता

  • पुरुषांच्या जोडी - सुनील बहादुर, मृदुल बोरगोहेन

  • पुरुष तिहेरी - दिनेश कुमार, नवनीत सिंग, चंदन सिंग

  • महिला एकेरी - नयनमोनी सैकिया

  • महिला दल – रूपा तिर्की, तानिया चौधरी, लवली चौधरी, पिंकी/न्यानमोनी सैकिया

टेबल टेनिस : भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता

  • पुरुष संघ पात्रता – हरमीत देसाई, सनील शेट्टी, अचंता शरथ कमल, जी साथियान

  • महिला संघ पात्रता - दिया चितळे, मनिका बत्रा, रीट टेनिसन, श्रीजा अकुला

स्विमिंग : भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता

  • ४०० मीटर फ्रीस्टाइल – कुशाग्र रावत

  • १०० मीटर बॅकस्ट्रोक – श्रीहरी नटराज

  • १०० मीटर बॅकस्ट्रोक S9 – आशिष कुमार

  • ५० मीटर बटरफ्लाय – साजन प्रकाश

क्रिकेट : भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता

  • गट स्टेज - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

ट्रायथलॉन : भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता

  • मुख्य - आदर्श एमएस, विश्वनाथ यादव

  • महिला - संजना जोशी, प्रज्ञा मोहन

बॉक्सिंग : भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता

  • पुरुष ६३.५ किलो – शिव थापा

  • पुरुष ६७ किलो – रोहित टोकस

  • पुरुष 75 किलो – सुमित कुंडू

  • पुरुषांचे 80 किलो – आशिष कुमार

बॅडमिंटन : भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:30 वाजता

  • मिश्र संघ (ग्रुप स्टेज) – भारत विरुद्ध पाकिस्तान

हॉकी : भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:30 वाजता

  • महिला (ग्रुप स्टेज) – भारत वि घाना

स्क्वॅश : भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता

  • महिला एकेरी - अनाहत सिंग

  • पुरुष एकेरी – अभय सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT