commonwealth games 2022 Indian Flagbearer PV Sindhu Fear Corona ESAKAL
क्रीडा

Commonwealth Games 2022 : कोरोनाची धास्ती! भारताच्या ध्वजधारक सिंधूच्या रिपोर्टमध्ये...

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games 2022) भारतीय संघ रवाना झाला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू (PV Sindhu) नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारताचा ध्वज आपल्या खांद्यावर (Indian Flagbearer) घेणार आहे. मात्र याच पीव्ही सिंधूला कोरोनाची (Corona) धास्ती वाटू लागली आहे. कारण तिच्या आरटी - पीसीआर चाचणीच्या (RT - PCR Test) अहवालात काही गडबड दिसत आहे. त्यामुळे तिला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

भारताचा 10 सदसीय बॅडमिंटनचा संघ हैदराबादहून बर्मिंगहमसाठी 25 जुलैला रवाना झाला. बर्मिंगहममधील टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीव्ही सिंधूच्या आरटी - पीसीआर चाचणीत काहीतरी गडबड दिसत आहे. ती राष्ट्रकुल स्पर्धेच्या व्हिलेजमध्ये दाखल झाली आहे मात्र तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

पीव्ही सिंधूने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तिला आता इतर संघापासून विलगीकरणात ठेवले आहे. हे विलगीकरण दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत असणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडू आणि चाहते देखील सिंधूचा दुसरा अहवाल निगेटिव्ह यावा यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात भारताचे बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचे मिशन प्रमुख प्रशासनाच्या सातत्याने संपर्क ठेवून आहेत.

नियमानुसार युकेमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूची 72 तासात आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. आता भारतीय खेळाडूंची बर्मिंहरममध्ये दाखल झाल्यानंतर दुसरी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधूला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिचे ध्वजधारक म्हणून नाव घोषित करण्यास विलंब केला होता.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नीरज चोप्राच्या माघारीनंतर भारताचा ध्वजधारक म्हणून सिंधू, लोव्हलिना आणि मीराबाई चानू यांच्या नावाचा विचार केला होता. सिंधूचे नाव त्यांनी घोषित करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT