Commonwealth Games Indian Women's Rely Team Player Failed Doping Test  esakal
क्रीडा

CWG 2022 : स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाला डोपिंगचा झटका

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना भारतीय महिला 4 बाय 100 मीटर रिले संघातील (Indian Women's Rely Team) एक सदस्याच्या शरिरात बंदी असलेलं उत्येजक द्रव्य (Doping) आढळून आले आहे. त्यामुळे ही खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेतून (Commonwealth Games) माघार घ्यावी लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी कोणताही अधिकारी या खेळाडूचे नाव सांगण्यास तयार नाही. दरम्यान, पीटीआयने 'राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी जाणाऱ्या रिले संघातील एक सदस्याची उत्त्येजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे ती खेळाडू माघार घेईल.' असे वृत्त दिले होते.

जर राष्ट्रकुल स्पर्धेतसाठीच्या 4 बाय 100 मीटर रिलेच्या संघातील खेळाडू उत्त्येजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सहभागी होऊ शकली नाही तर भारतीय रिले संघ फक्त 4 खेळाडूंनिशी स्पर्धेत उतरले. जर समजा एखाद्या खेळाडूला जरी दुखापत झाली तर इतर ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील खेळाडूला या संघात घ्यावे लागले. याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने यापूर्वी द्यूती चंद, हिमा दास, स्रबानी नंदा, एन.एस. सिमी, सेकार धनलक्ष्मी आणि एम. व्ही जिलना यांचा समावेश 37 अॅथलेटिक्स सदस्यांच्या संघात केला होता. मात्र भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अॅथलेटिक्सला फक्त 36 खेळाडूंचा कोटा मंजूर केल्यानंतर जिलनाने माघार घेतली होती.

धनलक्ष्मी उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने पुन्हा जिलनाला संघात सामिल करण्यात आले. आता उत्त्येजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेली खेळाडू ही आयत्यावेळी संघात आली होती. मात्र तिचे नाव अजून उघड करण्यात आलेले नाही.

राष्ट्रकुल संघातील दोन खेळाडू सेकार धनलक्ष्मी आणि ट्रिपल जंपर ऐश्वर्या बाबू हे देखील उत्त्येजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघातून वगळण्यात आले होते. धनलक्ष्मी दोन स्पर्धेबाहेरच्या चाचण्यात दोषी आढळली. तर ऐश्वर्या दोन स्पर्धांच्या चाचण्यात दोषी आढळली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT