controversy paris olympic esakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Controversy: बायोलॉजिकल पुरुष बॉक्सर महिलांच्या स्पर्धेत खेळला, ४५ सेकंदात जिंकला, Video Viral

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Boxing Controversy: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा गुरुवारचा दिवस वादाचा राहिला. अल्जेरियन बॉक्स इमान खेलिफने महिला बॉक्सिंग welterweight गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीच्या अँजेला कॅरिनीचा ४६ सेकंदात पराभव केला. पण, हा सामना वेगळ्याच कारणाने गाजतोय... खेलिफने जोरात पंच मारल्याने कॅरिनीच्या नाकाला जबर मार बसला आणि ती प्राथमिक उपचार घेण्यासाठी तिच्या प्रशिक्षकाकडे गेली. तिने तिचे हेडगिअर सरळ केले आणि पुन्हा लढण्यासाठी आली, परंतु ती पुन्हा कॉर्नरवर परतली आणि बॉक्सिंग रिंग बाहेर पडली.

त्यानंतर रेफरीने खेलिफला विजयी घोषिल केले. या निकालानंतर कॅरिनी रिंगमध्येच गुडघ्यावर बसली आणि ढसाढसा रडली...

कॅरिनी म्हणाली की तिने लढत सोडून दिली कारण तिला कधीच इतके कठोर मुक्के मारले गेले नव्हते. “मी नेहमीच माझ्या देशाचा सन्मान केला आहे. यावेळी मी यशस्वी झाली नाही, कारण मी यापुढे लढू शकत नाही. मला माझ्या नाकात तीव्र वेदना जाणवू लागल्या. माघार घेण्यासाठी हे पुरेसे होते,” असे कॅरिनी म्हणाली.

पण, या सामन्यामुळे पुन्हा एकदा खेलिफ चर्चेत आली कारण. महिलांच्या स्पर्धेत बायोलॉजिकली पुरुष असलेला खेळाडू खेळल्याचा दावा केला जात आहे. महिलांच्या स्पर्धांमध्ये XY गुणसूत्र असलेल्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) २०२३च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते आणि तेव्हापासून २५ वर्षीय खेलिफ चर्चेत आहे.

पण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिला पात्र ठरवण्यात आले. काही खेळांमध्ये महिलांच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या ऍथलीट्ससाठी परवानगी असलेल्या टेस्टोस्टेरॉनची पातळी मर्यादित केली आहे.

तैवानची दुहेरी विश्वविजेती लिन यू-टिंग हिनेही निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेत तिचे कांस्यपदक गमावले.

सोशल मीडियावर नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT