Argentina vs Colombia Twitter
क्रीडा

Copa : फायनलसाठी मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर कोलंबियाचे आव्हान

कोपा अमेरिका स्पर्धेतील दोन्ही सामन्यातील सेमी फायनलिस्ट फिक्स झाले आहेत.

सुशांत जाधव

कोपा अमेरिका स्पर्धेतील दोन्ही सामन्यातील सेमी फायनलिस्ट फिक्स झाले आहेत. ब्राझील आणि पेरु यांच्यात पहिला सेमीफायनल सामना 6 तारखेला रंगणार भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता सुरु होईल. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मेस्सीचा अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात रंगत पाहायला मिळेल. ही लढत बुधवारी 7 तारखेला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.30 वाजता तुम्ही पाहू शकता. (Copa America 2021 Messi leads Argentina semifinal clash against Colombia)

कोलंबिया आणि उरग्वे यांच्यात रंगलेल्या क्वार्टर फायनल सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर या सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये लागला. यात कोलंबियाने 4-2 अशी बाजी मारत सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. ऑलिम्पिकोच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघ 10-10 गड्यांसह खेळताना दिसले. पहिल्या हाफमधील इंज्यूरी टाईममध्ये पराग्वेच्या गुस्तेओ गोमेजला तर दुसऱ्या हाफमधील 85 व्या मिनिटाला पेरुच्या आंद्रे कॅरिलो याला रेफ्रींनी रेड कार्डसह बाहेरचा रस्ता दाखवला. इटालियन वंशाच्या जियांलुका लापाडुला याने पेरुसाठी दोन गोल डागले. पेनल्टी शूटआउटमध्ये पेरुचा गोल किपर पेड्रो गोलेसे याने अबर्टो एस्पिनोलाचा गोल अडवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने इक्वेडोअरला एकतर्फी पराभूत करत सेमीफायनल गाठली. पहिल्या हाफच्या खेळात रॉड्रिगो डी पॉलने 40 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये 84 व्या मिनिटाला एल मार्टिने याने अर्टेंटिनाची आघाडी 2-0 अशी केली. त्यानंतर इंज्युरी टाईममध्ये लिओनेल मेस्सीने तिसरा गोल डागला आणि या गोलसहस अर्जेंटिनाने 3-0 अशी बाजी मारली.

पहिल्या सेमीफायनलमध्ये गतविजेत्या ब्राझीलचे पारडे जड असून दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाचा संघ मजबूत दावेदार वाटतो. 11 जुलैला रंगणाऱ्या फायनलमध्ये हे नेयमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना यांच्यात लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले तर फुटबॉल चाहत्यांसाठी 11 जुलै रोजी रंगणारी फायनल पर्वणीच ठरेल. फायनलपूर्वी सेमीफायनलमधील लूजर तिसऱ्या स्थानासाठी 10 जुलैला समोरासमोर भिडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT