Copa America | Colombia vs Uruguay Sakal
क्रीडा

Copa America Video: सेमीफायनलनंतर राडा! चाहते अन् खेळाडूंमध्येही हाणामारी; घटनेची चौकशीही होणार

Colombia vs Uruguay: कोपा अमेरिका स्पर्धेत कोलंबिया विरुद्ध उरुग्वे संघात झालेल्या सेमीफायननंतर मोठा वाद झाल्याचे दिसून आले असून आता त्याची चौकशीही होणार आहे.

Pranali Kodre

Copa America, Colombia vs Uruguay: कोपा अमेरिका स्पर्धेतील उपांत्य फेरीत कोलंबिया विरुद्ध उरुग्वे संघात रोमांचक सामना गुरुवारी (११ जुलै) पार पडला. या सामन्यात कोलंबियाने जेफरसन लेर्माने केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेवर १-० अशा फरकाने विजय मिळवला.

मात्र या सामन्यानंतर स्टेडियममध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या वादाचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

झाले असे की सामन्यानंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती, ज्यात उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर डारविन नुनेजसह इतर खेळाडू देखील सामील झाल्याचे दिसून आले.

या सामन्यासाठी ७० हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते, यातील जवळपास ९० टक्के प्रेक्षक कोलंबियाचे समर्थक होते, पण काहीप्रमाणात उरुग्वेचे समर्थकही स्टेडियममध्ये होते.

यावेळी सामन्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले. यानंतर उरुग्वेचे खेळाडू पायऱ्या चढत होते. यादरम्यान, ते देखील या वादात सामील झाले. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना हे वाद सोडवण्यासाठी जवळपास १० मिनिट लागले.

दरम्यान, उरुग्वेचा कर्णधार जोस मारिया गिमेनेझने असे सांगितले की खेळाडू त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात होते.

यानंतर दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटना कॉनमेबोल (CONMEBOL) यांनी या भांडणावर निराशा व्यक्त केली आहे. याबरोबरच पुढे याबाबत चौकशी केली जाईल असंही म्हटलंय.

कॉनमेबोलच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं की 'कॉनमेबोलने घडलेल्या घटनेबाबत चौकशी सुरू केली असून सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये कोण सामील होते, याची चौकशी केली जाणार आहे.'

त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की अशाप्रकारचा हिंसाचार जागतिक फुटबॉलमध्ये सहन केला जाणार आहे.

दरम्यान, आता उरुग्वेला तिसऱ्या क्रमांकासाठी कॅनडाविरुद्ध सामना खेळायचा आहे. कॅनडाला अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत पराभूत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT