Lata Mangeshkar Big Cricket Fan Sakal
क्रीडा

भारत-पाक मॅच वेळी जेवण सोडून टीव्ही समोर ठाण मांडून होत्या लता दीदी

सुशांत जाधव

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि क्रिकेट याचे नाते अनोखे असेच होते. 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत (2011 World Cup) भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सेमी फायनलमध्ये त्यांनी चक्क उपासच केला होता. मोहालीच्या मैदानात भारतीय संघाने पाकिस्तानला 29 धावांनी नमवत फायनल गाठली आणि ती जिंकलीही. भारत-पाकिस्तान मॅच दरम्यानचा किस्सा त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. (Cricket Fan Lata Mangeshkar Fasted For India Victory During 2011 World Cup Semis Against Pakistan)

पाकिस्तान (Pakistan Cricket Team) विरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळणाऱ्या भारतीय संघातील (Indian Cricket Team) खेळाडूंप्रमाणेच दबावात होते, असे त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. भारत पाकिस्तान मॅच संपेपर्यंत तणावात होते. भारतीय संघ ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानात उतरायचा त्यावेळी संपूर्ण कुटुंबिय काही गोष्टी पाळायचो. मीना, उषास स्वत: मी मॅचचा निकाल लागेपर्यंत उपवास पाळायचो, असा किस्सा लता दीदींनी सांगितला होता. भारतीय संघाने जिंकाव यासाठी प्रार्थना करायचो आणि मॅच जिंकल्यानंतरच सर्वांच जेवण व्हायचं असा किस्सा त्यांनी शेअर केला होता.

30 मार्च 2011 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या हायहोल्डेज सामना रंगला होता. मोहालीच्या मैदानातील या सामनन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 260 धावा केल्या होत्या. लता दीदींच्या आवडत व्यक्तिमत्व असलेला आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक 85 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 49.5 षटकात 231 धावांत आटोपला होता. गोलंदाजीमध्ये जहीर खान, अशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या होत्या. सचिनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT