Trans Player in Womans Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक अहमदाबाद या ठिकाणी पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि काही नियम नव्याने बनवण्यात आले आहेत. दोन षटकांमधील वेळ ६० सेंकदांपेक्षा जास्त झाल्यास, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ धावांचा दंड ठोठावण्यात येईल, असा नियम बनवण्यात आला. त्याचबरोबर ट्रान्स खेळांडूचा महिला क्रिकेटमध्ये सामावेश करण्याबाबत आयसीसीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ट्रान्स खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये स्थान नाही
आयसीसीकडून यावेळी महिला क्रिकेटसाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कोणत्याही ट्रान्स खेळाडूंना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान देण्यात येणार नाही. महिलांच्या खेळाच्या अखंडतेचे संरक्षण, सुरक्षितता व जागरूकता यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
टाईमपासला आळा
टी-२० व एकदिवसीय अशा झटपट क्रिकेट प्रकारांमध्ये खेळाडूंकडून विनाकारण वेळ वाया घालवण्यात येतो. त्यामुळे लढतीची वेळही लांबली जाते. अशा प्रकारच्या टाईमपासला आळा घालण्यासाठी आयसीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आता समान मानधन
आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी कार्यरत असलेल्या पुरुष व महिला अशा दोन्ही अधिकाऱ्यांना आता समान मानधन देण्यात येणार आहे. अशी माहिती आयसीसीकडून याप्रसंगी देण्यात आली. जानेवारी, २०२४पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.