भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू झाला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्या त्यामुळे तो सामन्याला मुकला आहे. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराहला संघाची दूरा सोपावली आहे. दुसरीकडे संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याआधीच पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यालाच मुकला होता. त्याने पायावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्वरित जर्मनी गाठले होते. मात्र त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, आणि शनिवारी तो मायदेशी परतला.(kl rahul returns after successful surgery germany girlfriend athiya shetty)
केएल राहुल जर्मनीतून त्याच्या शस्त्रक्रिया करून मायदेशी परतला आला आहे. राहुल मुंबई विमानतळावर उतरला, तिथे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीही त्याच्यासोबत होती. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अथिया राहुलच्या पुढे चालत आहे आणि राहुल त्याच्या मागे काही अंतरावर चालत आहे. दोघेही एकमेकांशी न बोलता विमानतळाच्या बाहेर पडताना दिसत आहेत. राहुल आणि अथियाचा हा व्हिडिओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
केएल राहुल भारतात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेला देखील दुखापतीमुळे मुकला होता. केएल राहुल हा सध्या भारताचा तीनही फॉरमॅटमधील एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून 43 कसोटी 42 वनडे आणि 56 टी 20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो लखनौ सुपर जायंटचे नेतृत्व देखील करतो. भारत 2020-21 ला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघाने या मालिकेतील चार सामने झाले त्यावेळी 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र संघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. जर हा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णित ठेवला तर भारत इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.