मुंबई : मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅच फिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. १९९७ मध्ये श्रीलंकेत असलेली निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले, पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही होऊ शकत नाही, हे माझे ठाम मत आहे, पण स्पॉट फिक्सिंग तसेच वैयक्तिक फिक्सिंग नक्कीच होते, असा स्ट्रेट ड्राईव्ह लगावला आहे भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी.
निमित्त होते क्रिकेटमधल्या जिगरबाज खेळाडूंच्या कारकिर्दीचा- कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी एजिस फेडरल इन्शुरन्स आणि लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान संध्येचे. या सन्मान संध्येत अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी या दिग्गजांना दिलीप वेंगसरकर आणि करसन घावरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कपिल देवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणं सर्वांत मोठं आव्हान होतं. तेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. त्याला निवृत्तीबाबत सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली. पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले, अशी आठवण त्यांनी पुढे सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.