IPL 2022 : आयपीएलच्या आगामी हंगामात नवा माहोल दिसणार आहे. दोन नव्या फ्रेंचायझीसह (IPL New Franchise) विद्यमान फ्रेंचायझींनी यासाठी संघ बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदललेले असतील. दोन नवे संघ नव्या रणनितीसह विद्यमान संघाची हुकमत खल्लास करुन आपलं वर्चस्व गाजवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. नवा हंगाम आणि नवे दहा संघ (IPL 2022 10 Teams ) हा अध्याय असा नवा अध्याय यंदाच्या वर्षीपासून सुरु होईल. कसलेल्या फ्रेंचायझीला टक्कर देण्यासाठी नव्या फ्रेंचायझी मास्टर प्लॅनसह मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.(IPL 2022 Latest News In Marathi)
आगामी हंगामात पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात उतरण्यासाठी अहमदाबाद फ्रेंचायझीनंही कंबर कसली आहे. पीटीआय या विश्वसनीय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, आगामी आयपीएलच्या हंगामात (IPL 2022) अशीष नेहरा (Ashish Nehra) अहमदाबाद संघाच्या (IPL Ahmedabad Franchise) मुख्य प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत दिसेल. आशिष नेहरा आणि अहमदाबाद फ्रेंचायझी यांच्यात यासंदर्भात चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात असून कनेक्टिंग पिपल ही स्लोगन असलेला नोकियाचा साधा फोन वापरणारा टीम इंडियाचा माजी जलदगती गोलंदाज नव्या संघाला मार्गदर्शन करताना दिसेल. नेहराने ऑफर मान्य केली असून यासंदर्भातील आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे वृत्त आहे.
इंग्लंडचा माजी सलामी फलंदाज विक्रम सोळंकी याला डायरेक्टर ऑफ क्रिकेटच्या पदावर नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर गॅरी कर्स्टन (Gary Christian) यांना अहमदाबाद फ्रेंचायझीनं मेंटॉरची ऑफर दिली आहे. आयपीएलमध्ये मोठी जबाबदारी स्विकारण्याची आशिष नेहराची ही पहिली वेळ नसेल. यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कोचपदी काम केले आहे.
आयपीएलशी सलग्नित एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आशिष नेहरा अहमदाबाद संघाच मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जवळपास पक्की आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. इंग्लंडचा विक्रम सोळंकी डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि फलंदाजी कोच म्हणून नियुक्ती करण्याचा प्लॅन सुरु आहे. गॅरी कर्स्टन यांच्या रुपात तगडा अनुभव असणारा दिग्गज या संघाला मेंटॉर म्हणून लाभणार आहे.
अहमदाबाद फ्रेंचायझी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. त्यांच्याशिवाय लखनऊ फ्रेंचायझीसाठीही यंदाची स्पर्धा पहिली असेल. आगामी आयपीएलसाठी मेगा लिलावाची प्रक्रिया ही जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मेगा लिलावापूर्वी दोन्ही नव्या फ्रेंचायझींना रिटेन खेळाडून निवडण्याची संधी असेल. आयपीएलच्या नियमावलीनुसार, दोन्ही नव्या फ्रेंचायझींना मेगा लिलावाआधी प्रत्येकी तीन तीन खेळाडू निवडता येतील. तगड्या खेळाडूंची निवड करुन दोन्ही फ्रेंचायझील लिवावासाठी सज्ज होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.