Sreesanth Twitter
क्रीडा

श्रीसंतला हवी ती संधी मिळाली; भाऊचा आनंद गगनात मावेना!

आता क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यास तो सज्ज

सुशांत जाधव

भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू आणि मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटपासून दूर गेलेला श्री संत (S. Sreesanth) पुन्हा एकदा रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालाय. 38 वर्षीय जलदगती गोलंदाज 2013 मध्ये झालेल्या आयपीएलमधील कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई झाली. या शिक्षेत बदल करुन सात वर्षानंतर त्याचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. मर्यादित षटकांच्या स्पर्धेत खेळल्यानंतर आता क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यास तो सज्ज झाला. केरळने त्याला 24 सदस्यीय संघात स्थान दिले आहे. (S. Sreesanth to Make Comeback in Red Ball Cricket)

केरळचा जलदगती गोलंदाज 9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रेड बॉलवर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीसंतने 2013 मध्ये अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. मुंबई विरुद्ध खेळताना त्याने शेष भारत संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे त्याचे क्रिकेट करियरच धोक्यात आले होते. सात वर्षांच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. या गोष्ट श्रीसंतला आनंद देणारी अशीच आहे. श्रीसंतने रविवारी ट्विटरच्या माध्यमातून उत्सुकता व्यक्त केली. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘9 वर्षांनी रणजी ट्रॉफीत कमबॅक करतोय. ही बातमी खूप आनंद देणारी आहे. संधी दिल्याबद्दल त्याने केरळ क्रिकेट बोर्डाचे आभारही मानले आहेत.

2013 मध्ये श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. त्याच्यासह अजीत चंदेला आणि अंकित चव्हाण या क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. आयपीएलच्या सातव्या हंगामात हा सर्व प्रकार घडला होता. पण सबळ पुराव्याच्या अभावामुळे न्यायालयाने त्याची शेवटी निर्दोष सुटका केली. त्याच्यावरील अजीवन बंदी हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT