भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बुधवारी रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबतच्या कथित वादावर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्याने माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना गोत्यात आणणारे वक्तव्य केले आहे. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत.
भारतीय वनडे संघातील कॅप्टन्सी बदलाच्या स्पष्टीकरणावेळी दादाने दिलेले स्पष्टीकरण आणि विराट कोहलीने केलेले वक्तव्य यात जमीन आसमानचा फरक आहे. सौरव गांगुली यांच्यासाठी वाद ही काही नवी गोष्ट नाही. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल (Greg Chappell) आणि गांगुली यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. याशिवाय अन्य काही गोष्टीमुळे गांगुली वादात अडकले होते. जाणून घेऊयात त्याच संदर्भातील आढावा...
गांगुली-द्रविड यांच्यातही झाला होता वाद
ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांच्यासोबतच्या वादानंतर 2005 मध्ये सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) कर्णधार पद सोडावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी ही राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) देण्यात आली होती. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी गांगुलीने पुन्हा संघात स्थान मिळवले. त्याकाळात गांगुलीने द्रविड विरोधात कधीच भाष्य केले नाही. पण 2011 मध्ये एका मुलाखतीत त्याने द्रविडच्या नेतृत्व शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चॅपल यांच्या कार्यकाळात चुकीच्या गोष्टींवर परखड मत मांडण्याचे धाडस द्रविडने दाखवले नाही. शांतीप्रिय द्रविडने खटकणाऱ्या गोष्टीला विरोध करण्याची हिंमत दाखवली नाही, असे गांगुलीने म्हटले होते. त्याची मुलाखत चांगलीच गाजली होती.
सौरव-रवी शास्त्री यांच्यातही वाद
2016 मध्ये अनिल कुंबले (Anil Kumble) यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या तीन सदस्यीय सल्लागार समितीने कुंबळे यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी रवी शास्त्रींनीही मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुलाखत दिली होती. त्यावेळी शास्त्रींनी बँकॉकमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत दिली होती. यावेळी सौरव गांगुली त्यांच्या मुलाखतीवेळी अनुपस्थिती राहिला होता. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना ही गोष्ट चांगली खटकली होती. एका मुलाखतीमध्ये शास्त्रींना यावर भाष्य केले होते. गांगुलीने अपमान केल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.