नई दिल्ली : सौरभ गांगुलीच्या अध्यक्षतेखालील आयसीसी पुरूष क्रिकेट समितीने एमसीसी (Marylebone Cricket Club) च्या 2017 च्या क्रिकेट नियमांच्या तिसऱ्या आवृत्तीत प्लेइंग कंडिशनमध्ये बदल करण्याची शिफारस केली होती. आता या शिफारसी आयसीसी क्रिकेट समितीने 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरूषांबरोबरच महिला क्रिकेट समितीकडे देखील हे पाठवण्यात आले आहेत. त्यांनी देखील या शिफारसींचे समर्थन केले आहे. आता हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. याचा अर्थ या नव्या नियमांचा वापर ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये होणार आहे. (ICC Will Implemented New Rules From 1st October)
1 फलंदाज झेलबाद झाल्यावर नवा फलंदाज स्ट्राईकवर येणार
यापूर्वी जर स्ट्राईवरचा फलंदाज झेल बोद होण्याआधी नॉस्ट्राईकर एंडला पोहचला तर नवा येणारा फलंदाज नॉन स्ट्राईकरवर उभा राहील. तर क्रॉस झाल्यानंतर नॉन स्ट्राईकरचा फलंदाज पुढचा चेंडू खेळत होता. मात्र आता हा नियम बदलण्यात आला असून आता जरी झेल बाद होणारा फलंदाज नॉन स्ट्राईकरला पोहचला असला तरी नवा येणारा फलंदाज हाच स्ट्राईक घेईल.
2 चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी
कोरोना काळात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेत चेंडू शाईन करण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी कायमस्वरूपी लावण्यात येणार आहे.
3 फंलदाज होणार टाईम आऊट
नव्या नियमानुसार फलंदाजाला कसोटी आणि वनडेमध्ये स्ट्राईक दोन मिनिटात घ्यावी लागणार आहे. यापूर्वी नव्या फलंदाजाला क्रीजवर येण्यासाठी 3 मिनिटे वेळ दिला जायचा. याचबरोबर आता टी 20 क्रिकेटमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर नव्या फलंदाजाला 90 सेकंदाच्या आत मैदानावर पोहचणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर फलंदाजाला येण्यात उशीर झाला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने टाईम आऊटची अपील केली तर तो फलंदाज बाद ठरवण्यात येईल.
4 चेंडू खेळण्याचा फलंदाजाचा अधिकार
जर चेंडू 22 यार्ड खेळपट्टीच्या बाहेर पडतो तर तो खेळण्यासाठी फलंदाज किंवा बॅटचा काही भाग खेळपट्टीच्या आत असणे गरजेचे असणार आहे. जर फलंदाजाने खेळपट्टीच्या बाहेर जावून चेंडू मारला तर तो डेड बॉल दिला जाईल. याचबरोबर जर एखादा चेंडू फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा असेल तर चेंडू नो बॉल दिला जाईल.
5 डेड बॉल
नव्या नियमानुसार गोलंदाज चेंडू टाकत असताना कोणता अनुचित प्रकार किंवा मुद्दाम कोणत्याही प्रकारती हालचाल झाली तर अंपाय तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात. याशिवाय आता फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा पेनाल्टीच्या रूपात देखील मिळतील.
6 डिलीव्हरी स्ट्राईड
जर एखाद्या गोलंदाजाने आपल्या डिलीव्हरी स्ट्राईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला तर तो आता डेड बॉल असणार आहे. यापूर्वी त्याला नो बॉल म्हटलं जायचं.
7 एक अतिरिक्त फिल्डर सर्कलच्या आत
आता टी 20 प्रमाणेच वनडे क्रिकेटमध्ये देखील ठराविक वेळेत षटके पूर्ण केली नाहीत तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत ठेवावा लागणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यावेळी आपण आपल्याला हे बघायला मिळालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.