Cricket Viral Video: हा तर सूर्यापेक्षा भारी निघाला! क्रिकेट विश्वात अशी कॅच कधी कोणी पाहीलीच नसेल sakal
क्रीडा

Cricket Viral Video: हा तर सूर्यापेक्षा भारी निघाला! क्रिकेट विश्वात अशी कॅच कधी कोणी पाहीलीच नसेल

Chinmay Jagtap

Viral Video: आजवर क्रिकेटमध्ये खूप भारी भारी कॅच तुम्ही पाहीले असतील. यातच T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेता कॅच आपल्याला आठवतोच. मात्र त्याहूनही एक ग्रेट कॅच सध्या व्हायरल होत आहे.

क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो की,क्षेत्ररक्षण करतांना खेळाडू पायाने चेंडू वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पायाने कॅच घेतल्याचे क्वचीतच पहायला मिळते. अशावेळी ECS बल्गेरिया 2024 मध्ये असाच एक कॅच एक फिल्डरने घेतला आहे. आणि त्याचा हा ग्रेट कॅच सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ECS बल्गेरिया 2024 मध्ये, VTU-MP Pleven of Bulgaria आणि Afyonkarahisar SHS संघांमध्ये T10 सामना खेळला जात होता.या सामन्यात Afyonkarahisar SHS संघाच्या कुरसद दलयान या खेळाडूने एक अजब कॅच पकडला. कुर्सदने पायाने चेंडू हवेत फेकला नंतर एका हाताने तो पकडला पुढे पंचाकडे अपिल केली. त्यानंतर पंचाने फलंदाजाला आऊट म्हणून घोषित केले. यामुळे वाद प्रतीवाद सुरू झाले आहेत.

सामन्याच्या सुरूवातीला Afyonkarahisar SHS ने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी १० ओव्हरमध्ये त्यांनी 104/5 अशी धावसंख्या केली. VTU-MU Plevenला १० ओव्हरमध्ये फक्त 40/8 इतकेच रन करता आले.

व्हायरल व्हिडीओवर सध्या कमेंटचा पाऊस पडत आहे. एकाने कमेंट केली आहे की, या गोष्टी फार क्वचित घडतात. मस्त मित्रा.

जेव्हा तुम्हाला फुटबॉललर व्हायचे होते पण तुम्ही क्रिकेटची निवड करता अशी कमेंट दुसऱ्याने केली आहे. डाईव्ह मारण्याची जोखीम का घ्या जेव्हा तुम्ही किक अप करू शकता आधुनिक उपाय अशी कमेंट तिसऱ्याने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT