Arshdeep Singh T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Arshdeep Singh : बुमराहलाही जे जमलं नाही ते अर्शदीप सिंगनं करून दाखवलं; टी 20 वर्ल्डकप इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

Arshdeep Singh USA vs India : अर्शदीप सिंगने पहिल्या षटकातच दोन धक्के देत भारताला धडाकेबाज सुरूवात करून दिली.

अनिरुद्ध संकपाळ

Arshdeep Singh USA vs IND T20 : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी 20 वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला. युएसए आणि भारत यांच्यातील पहिल्याच टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहितने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीप सिंगवर सोपवली. या पठ्ठ्याने देखील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत भारताला धडाकेबाज सुरूवात करून दिली. विशेष म्हणजे टी 20 वर्ल्डकप इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अर्शदीप सिंग हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर भारताने पहिल्या षटकातच युएसएला दोन धक्के दिले. अर्शदीप सिंगने जहांगीरला शुन्यावर तर आंद्रियासला 2 धावांवर बाद केलं. यानंतर युएसएची पॉवर प्लेमध्ये फलंदाजी संथ झाली. त्यांना पॉवर प्लेमध्ये 18 धावांपर्यंतच मजल मारतला आली.

पॉवर प्ले संपल्यानंतर हार्दिक पांड्याने युएसएचा धडाकेबाज फलंदाज अॅरोन जोन्सला 11 धावांवर बाद करत त्यांना मोठा धक्का दिला. युएसएने कसे बसे आपले अर्धशतक पूर्ण केले. इतक्यात अक्षर पटेलने टेलरचा त्रिफळा उडवत युएसएची अवस्था 4 बाद 56 धावा अशी केली.

या पडझडीनंतर नितीश कुमार आणि कोरे अँडरसनने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT