T20 World Cup 2024 AUS Vs Oman News Marathi 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC 2024 : टूर्नामेंटमध्ये कांगारू संघाची धमाकेदार सुरूवात! पहिल्या सामन्यात 'या' संघाला लोळवलं

T20 World Cup 2024 AUS Vs Oman : आज टी-20 वर्ल्ड कप 2024 चा दहावा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोस येथे खेळला गेला.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 AUS Vs Oman : आज टी-20 वर्ल्ड कप 2024 चा दहावा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोस येथे खेळला गेला. कांगारू संघाने हा सामना 39 धावांनी जिंकला. आणि या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर अनेक मोठी नावे आहेत ज्यांनी छोट्या संघांविरुद्ध खराब कामगिरी करून संघाची निराशा केली. आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यात फ्लॉप ठरले.

या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 164 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मार्कस स्टॉइनिसने 36 चेंडूत सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान स्टॉइनिसने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. तर डेव्हिड वॉर्नरने 56 धावा केल्या. वॉर्नरने आपल्या खेळीत 6 चौकार आणि एक षटकार लगावला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान संघाला 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 125 धावा करता आल्या. ओमानकडून फलंदाजी करताना अयान खानने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. या सामन्यात ओमानच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्कने 2, नॅथन 2 आणि ॲडम झाम्पाने 2 बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT