Babar Azam Video T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Babar Azam Video : आझम खानवर बोलणं पडणार महागात... पाकिस्तानचा कर्णधार वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच आला अडचणीत?

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Video T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये सर्वांचे लक्ष पाकिस्तानकडे असणार आहे. बाबर आझम पुन्हा संघाचा कर्णधार झाला असून संघात दुफळी माजल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ 2022 मध्ये उपविजेता ठरला होता. मात्र त्यानंतर वनडे वर्ल्डकपमध्ये त्यांना फारशी चांगली कामगिरी तरा आली नाही.

आता वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल झाला. मात्र संघ निवडीपासूनच पाकिस्तानचा संंघ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर खुद्द कर्णधारावरच आपल्याच संघातील संघ सहकाऱ्याविरूद्ध बॉडी शेमिंग केल्याचा आरोप होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी क्रिकेट चाहते व्हायरल करत आहेत. पाकिस्तानचा संघ सराव करत असताना ते मजा म्हणून रग्बी गेम खेळ होते. त्यावेळी बाबर आझम विकेटकिपर आझम खानला उद्येशून काहीतरी बोलत होता.

काही पाकिस्तानी चाहत्यांनी बाबर आझम हा आझम खानला गेंडा म्हणत आहे अशी पोस्ट केली. तर काही चाहत्यांच्या मते बाबर आझम त्याला वेगळंच काहीतर बोलत आहे असा दावा केला.

पाकिस्तानचा विकेटकिपर आझम खान सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रडावर आहे. त्याला नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने दोन सामन्यात फक्त 11 धावा केल्या. याचबरोबर विकेटच्या मागे देखील त्यानं गचाळ विकेटकिपिंग केली.

त्याने साधे साधे अनेक झेल सोडले. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्याच्या टी 20 वर्ल्डकपमधील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 25 वर्षाचा आझम खान हा पाकिस्तान संघातील सर्वात वजनदार खेळाडू आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT