Babar Azam T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Babar Azam : बाबर आझमने छोट्या फॅनला केलं खूश; संजना गणेशननं सांगितलं नेमकं काय घडलं

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने न्यूयॉर्कमध्ये आपल्या एका छोट्या चाहत्याला खूश करून टाकलं. हा छोटा चाहता भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचला होता. त्याला बाबर आझमला भेटायचं होतं. मात्र बाबर आझमशी त्या मुलाशी भेट झाली नाही. पाकिस्तानचा संघ हरला होता त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही.

मात्र पाकिस्तानने न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर कॅनडाचा पराभव केला अन् या चिमुकल्याला आपल्या आयडॉलला भेटण्याची संधी मिळाली. यावेळी बाबर आझमने या छोट्या मुलाला मिठी मारली. याचबरोबर बाबर आझमने या मुलाला आपले बॅटिंग ग्लोज देखील दिले. यानंतर बाबर आझम क्रिकेट प्रेजेंटर संजना गणेशनशी बोलला.

बाबर आझमने संजनाला सांगितले की, 'हा छोटा चाहता भारत - पाकिस्तान सामना पाहण्यासाठी देखील आला होता. माझा हा चाहता त्या दिवशी खूप रडला होता. त्याला मला भेटता आलं नव्हतं. राष्ट्रीगीतानंतर तो पुन्हा माझ्या जावळ आला होता आणि रडू लागला. तो म्हणाला मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.'

'आता त्याच्याशी भेट तो खूप खूश आहे. या गोष्टी आमच्यासोबत देखील झाल्या आहेत. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी कोणच्या स्टार खेळाडूला भेटलो तर आम्हाला देखील असाच आनंद व्हायचा.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT