Bangladesh vs Sri Lanka T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

BAN vs SL T20 World Cup : पॉइंट टेबलमध्ये वाढली चुरस! बांग्लादेशविरुद्ध पराभवानंतर चॅम्पियन टीम शर्यतीतून बाहेर?

Bangladesh vs Sri Lanka T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपचा 15वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला.

Kiran Mahanavar

Bangladesh vs Sri Lanka T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये समीकरण बदललेले दिसत आहे. वर्ल्ड कप 2024चा पंधरावा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कप 2014 ची चॅम्पियन टीम श्रीलंकेचा पराभव करत 2 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

या पराभवासह श्रीलंकेचे सुपर-8 साठी पात्र ठरण्याचे स्वप्नही भंग पावल्याचे दिसत आहे. कारण श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेले दोन्ही साखळी सामने गमावले आहेत, त्यामुळे आता सुपर-8 साठी पात्र ठरणे कठीण आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचा ड गटात समावेश आहे. या पराभवामुळे श्रीलंका सुपर-8 मधून बाहेर पडेलच, पण आता टॉप 2 संघही जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. बांगलादेशच्या विजयानंतर ड गटातील कोणते दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरणार आहेत याचा अंदाज लावणे सोपे झाले आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ड गटात पहिल्या स्थानावर आहे. आफ्रिकेने श्रीलंकेला हरवून हे स्थान मिळवले. आता आफ्रिकेला आणखी 3 साखळी सामने खेळायचे आहेत, ज्यात बांगलादेश, नेपाळ आणि नेदरलँड्सविरुद्ध सामने होतील. आफ्रिका या 3 पैकी 2 सामने सहज जिंकेल. जरी तो दोन सामने जिंकला नाही, तरीही तो चांगल्या नेट रन रेटने एक सामना जिंकून पात्र ठरू शकतो.

याशिवाय दुसऱ्या स्थानावर पात्र ठरणारा संघ बांगलादेशचा असू शकतो. बांगलादेश आणि नेदरलँडने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. नेदरलँड हा कमकुवत संघ आहे, त्यामुळे आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे जाणार नाही.

नेदरलँड्सने पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला आहे. यावरून आफ्रिकेनंतर ड गटातून पात्र ठरणारा संघ बांगलादेशचा असू शकतो हे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत नेपाळ, नेदरलँड आणि श्रीलंका हे संघ ड गटातून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT