South Africa Lose T20 World Cup 2024 Final Against India 
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Sa : दक्षिण आफ्रिका जिंकता जिंकता हरली अन् दिग्गज खेळाडूने केली शिवीगाळ! पोस्ट होतोय व्हायरल

Kiran Mahanavar

South Africa Lose T20 World Cup 2024 Final Against India : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावून भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या आशांना मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत येणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचे स्वप्न भंगले. दरम्यान माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी टी-20 वर्ल्ड कप फायनलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. कारण भारताचा 17 वर्षांचा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ संपवायचा होता, तर दक्षिण आफ्रिकेचे चाहते प्रथमच विश्वविजेते बनण्याचे स्वप्न पाहत होते. टीम इंडियाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन इतका चिडला होता की, त्याने सोशल मीडियावर एक अपशब्द वापरला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. यानंतर अक्षर पटेलसह विराट कोहलीने डाव सांभाळला. विराटने 59 चेंडूत 76 धावा केल्या तर अक्षर 47 धावांची खेळी खेळून बाद झाला. शिवम दुबेच्या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने 7 बाद 176 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या दोन विकेट्स गमावून जोरदार पुनरागमन केले आणि सामना भारताच्या आवाक्याबाहेर नेला. मात्र, क्लासेनने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले आणि संघाला विजयाकडे वाटचाल सुरू केली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी योग्य वेळी विकेट घेत भारतासाठी पुनरागमन केले आणि दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखले आणि संस्मरणीय विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT